• Download App
    कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आता मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग।China find new patent of bird flu

    कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आता मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग

    वृत्तसंस्था

    बीजिंग : कोरोनाच्या उद्रेकाला जबाबदार असलेल्या चीनमध्य आता आणकी एक संसर्गाचा जन्म झाला आहे. ‘बर्ड फ्लू’च्या एच १० एन ३ या विषाणूचा मानवाला संसर्ग झाल्याची पहिली घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. चीनच्या जिआंगसू प्रांतात एका ४१ वर्षीय व्यक्तीला हा संसर्ग झाला आहे.
    बर्ड फ्लूच्या विषाणूचे अनेक प्रकार चीनमध्ये आढळून येतात. पोल्ट्री व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना तो होत असल्याचेही दिसून आले आहे. एप्रिल महिन्यात चीनमध्ये बर्ड फ्लूच्या ‘एन५एन६’ या विषाणूचा संसर्ग पसरल्याचे आढळून आले होते. China find new patent of bird flu



    या व्यक्तीची प्रकृती उत्तम असून तिला लवकरच घरी पाठवले जाईल, असे वृत्त चिनी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. हा पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांपासून हा मानवाला झालेला संसर्ग असून त्याची साथ पसरण्याची चिन्हे नाहीत, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित रुग्णाला ‘एच १० एन ३’ विषाणूचा संसर्ग झाल्याचे २८ मे रोजी स्पष्ट झाले होते. त्यानंतर असे दुसरे कोणतेही प्रकरण आढळून आलेले नाही. हा विषाणू फारसा प्रभावी आणि संसर्गक्षम नसल्याने प्रसार होण्याची भीती नाही, असेही चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

    China find new patent of bird flu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये