विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनमधील विविध विद्यापीठांमध्ये २३ हजार भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी २१ हजार विद्यार्थी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहेत. विदेशी विद्यार्थ्यांना परतण्याची चीन सरकारकडून परवानगी मिळत आहे, मात्र भारतामध्ये संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.China bans for students travelling
चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले आणि सुटी असल्याने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मायदेशी आलेले हजारो भारतीय विद्यार्थी अद्यापही घरीच अडकून पडले आहेत. अनेक महिने होऊन गेले तरी संसर्गाच्या स्थितीमुळे लागू केलेले आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध दूर होण्याची चिन्हे नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हिवाळ्याच्या सुटीमुळे चीनमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी भारतात आले होते. त्याच वेळेस कोरोना संसर्गाचा चीनमध्ये आणि नंतर जगभरात उद्रेक झाल्याने सर्वच देशांनी आपापल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे हे विद्यार्थी मायदेशातच अडकून पडले आहेत.
त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु असले तरी वैद्यकीय शिक्षण घेताना अत्यावश्य क असलेल्या प्रॅक्टिकल वर्गांपासून मात्र ते वंचित रहात आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता वाटत असून ते चीनमधील आपापल्या महाविद्यालयांमध्ये जाण्यास उत्सुक आहेत.
China bans for students travelling
महत्त्वाच्या बातम्या
- खेड तालुक्यात सैराट, प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या, हॉटेलमालकाच्या मारहाणीत प्रियकरासह मित्राचा मृत्यू, प्रेयसीही जखमी
- तमिळ सुपरस्टार थलपती विजयला मद्रास उच्च न्यायालयाचा दणका, करासोबतही दंडही भरण्याचा आदेश
- काश्मीर खोऱ्यात अवघ्या सात महिन्यांत ७८ दहशतवाद्यांचा खात्मा
- दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्क परताव्याबाबत लवकर निर्णय घ्या, न्यायालयाचे आदेश
- लहान मुलांनाही लवकरच लस, लशींच्या चाचण्या पूर्णत्वाच्या मार्गावर