• Download App
    कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांनी पॅरासिटामॉल, पेनकिलर घेणे टाळावे; भारत बायोटेकचे आवाहन । Children should avoid taking paracetamol, painkillers after taking the covaxin vaccine; Appeal of Bharat Biotech

    कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांनी पॅरासिटामॉल, पेनकिलर घेणे टाळावे; भारत बायोटेकचे आवाहन

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर किशोरवयीन मुलांनी पॅरासिटामोल, पेन किलर घेऊ नये, असा सल्ला लसनिर्माती कंपनी भारत बायोटेकने दिला. Children should avoid taking paracetamol, painkillers after taking the covaxin vaccine; Appeal of Bharat Biotech

    कोरोना विरोधातील प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेकने याबाबत बुधवारी एक परिपत्रक काढले आहे. त्यात लस घेतल्यानंतरच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या. कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर किशोरवयीन मुलांनी पॅरासिटामॉल किंवा पेनकिलर घेणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. काही लसीकरण केंद्रं मुलांसाठी कोवॅक्सिनसह ३ पॅरासिटामॉल ५०० मिलिग्राम गोळ्यांची शिफारस करत आहेत. परंतु,  लसीकरणानंतर पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेण्याची शिफारस आम्ही केली नाही.



    ते म्हणाले की ३० हजार व्यक्तींच्या चाचण्या केल्या. सुमारे १०-२० टक्के व्यक्तींनी साइड इफेक्ट्स जाणवले. यापैकी अनेकांना सौम्य साइड इफेक्ट्स जाणवतात, जे १-२ दिवसांत नाहिसे होतात. त्यामुळे त्यांना औषधांची गरज नसते. कोणतीही पेन किलर डॉक्टरांचा सल्लानंतरच घ्यावी, असं कंपनीनेही म्हटलं आहे.

    Children should avoid taking paracetamol, painkillers after taking the covaxin vaccine; Appeal of Bharat Biotech

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!