रामजन्मभूमी- बाबरी मशीद हा वाद देशातील सर्वात मोठा न्यायालयीन खटला होता. सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या काळात या वादावर निकाल देण्यात आला. रामजन्मभूमीसाठी जागा दिल्याने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. या वादात प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान याने मध्यस्ती करावी अशी सरन्यायाधिश बोबडे यांची इच्छा होती, असा दावा दिल्लीतील एका वकीलाने केला आहे.Chief Justice thinks Shah Rukh Khan should mediate in Ram Janmabhoomi-Babri Masjid dispute
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रामजन्मभूमी- बाबरी मशीद हा वाद देशातील सर्वात मोठा न्यायालयीन खटला होता. सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या काळात या वादावर निकाल देण्यात आला.
रामजन्मभूमीसाठी जागा दिल्याने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. या वादात प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान याने मध्यस्ती करावी अशी सरन्यायाधिश बोबडे यांची इच्छा होती, असा दावा दिल्लीतील एका वकीलाने केला आहे.
सरन्यायाधिश शरद बोबडे आज पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभात सुप्रिम कोर्ट बारा असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंग यांनी हा दावा केला. बोबडे यांच्या गौरवपर भाषणात बोलताना विकास सिंग म्हणाले, शरद बोबडे यांना वाटत होते
की शाहरुख खान याने रामजन्मभूमी- बाबरी वादात मध्यस्ती करावी. त्यासाठी शाहरुख खाननेही तयारी दर्शविली होती. अयोध्या वादावरील सुनावणीच्या प्राथमिक टप्यात शरद बोबडे यांचे प्रामाणिकपणे मत होते की मध्यस्तीनेच हा प्रश्न सुटावा.
त्यांनी मला विचारले होते की शाहरुख खान यासंदर्भातील समितीचा सदस्य होण्यास तयार होईल. मी विचारल्यावर शाहरुख खानने त्याला आनंदाने मान्यता दिली. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे हा मध्यस्तीचा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही.
शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादात ऐतिहासिक निकाल दिला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये यावर निर्णय देण्यात आला. रामजन्मभूमी स्थळावरील रामलल्लाचा अधिकार मान्य करण्यात आला. त्याचबरोबर बाबरी मशीदीसाठीही पाच एकर जागा देण्याचा निर्णय झाला.
Chief Justice thinks Shah Rukh Khan should mediate in Ram Janmabhoomi-Babri Masjid dispute