• Download App
    मुख्य निवडणूक आयुक्तांचा तीन दिवस उत्तर प्रदेश दौरा; विभागवार आढावा बैठकांनंतर निवडणुकीबाबत निर्णय । Chief Election Commissioner's three-day visit to Uttar Pradesh; Decision regarding election after departmental review meetings

    मुख्य निवडणूक आयुक्तांचा तीन दिवस उत्तर प्रदेश दौरा; विभागवार आढावा बैठकांनंतर निवडणुकीबाबत निर्णय

    वृत्तसंस्था

    लखनऊ : पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुशिलचंद्रा आज लखनऊ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. Chief Election Commissioner’s three-day visit to Uttar Pradesh; Decision regarding election after departmental review meetings

    उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते विभागवार दौरा करून तेथील अधिकाऱ्यांच्या निवडणूक तयारी संदर्भातल्या बैठका घेतील. देशभरात कोरोनाची आणि ओमायक्रोनची लाट वाढते आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेत उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार का नाही अशी शंका उपस्थित होत असताना निवडणूक आयुक्तांचा हा उत्तर प्रदेश दौरा होत आहे.

    निवडणूक आयुक्तांना बरोबरच्या या बैठकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे बरोबरच राज्याच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहत असून त्यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्यातली आरोग्य स्थिती जाणून घेण्यात येत आहे. यामध्ये त्यांच्या फीडबॅक नुसार निर्णय घेणे निवडणूक आयोगाला सुलभ होणार आहे. तीन दिवसांच्या दौर्यात निवडणूक आयुक्त पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्वांचल अशा विभागवार बैठका घेऊन अंतिम निर्णय नंतर घेणार आहेत.

    Chief Election Commissioner’s three-day visit to Uttar Pradesh; Decision regarding election after departmental review meetings

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका