विशेष प्रतिनिधी
रायपूर : राहूल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मर्यादा विसरू नका अशा शब्दांत धमकावले आहे. मुख्यमंत्र्यांची गुंडगिरी असल्याचा आरोप नेटीझन्सनी केला आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्र भूपेश बघेल यांनी ट्वीट करत राहुल गांधींवर टीका करणाºयांना सुनावत तुमच्या मयार्दा विसरू नका, अशा आशयाचं ट्वीट केले आहे. Chhattisgarh CM threatens media criticizing Rahul Gandhi, netizens allege hooliganism
भूपेश बघेल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अर्थात माध्यमांचा उल्लेख केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये भूपेश बघेल म्हणतात, कान उघडून ऐकावं सगळ्यांनी. राहुल गाधी या वेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्याविषयी अभद्र भाषेचा वापर काँग्रेसचे कार्यकर्ते अजिबात सहन करणार नाहीत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडणाऱ्या माध्यमांचा पूर्ण आदर आहे. पण कुणी मयार्दा विसरु नयेत.
टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर संपादक नाविका कुमारी यांनी राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह शब्दांच उल्लेख केला होता. त्यामुळे बघेल यांनी ही धमकी दिली आहे. भूपेश बघेल यांनी हे ट्वीट केल्यानंतर त्यावर नेटिझन्सनी, विशेषत: भाजपाकडून बघेल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. काहींनी भूपेश बघेल यांना थेट गुंडाची उपमा दिली आहे. काहींनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलेली ही खुली धमकी असल्याचा उल्लेख ट्वीटमध्ये केला आहे.
Chhattisgarh CM threatens media criticizing Rahul Gandhi, netizens allege hooliganism
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझे याची होणार तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी; घरीच नजरकैदेत ठेवण्याचे अपील फेटाळले
- नाही – नाही म्हणत कॅप्टन साहेब पोहोचले अमित शहांकडे; पंजाबच्या राजकीय भूकंपाचा तिसरा अंक सुरू
- तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?
- भाजप किसान मोर्चा साखर संकुलवर धडकला एकरकमी FRP देण्याची आग्रही मागणी