विशेष प्रतिनिधी
रायपूर : ब्राम्हणांवर बहिष्कार टाका. त्यांना तुमच्या गावात येऊ देऊ नका असे विषारी आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी केले आहे. पोलीसांनी त्याची दखल घेऊन नंदकुमार बघेल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.Chhattisgarh Chief Minister’s father says boycott Brahmins, police filed case agaist him
उत्तर प्रदेशात एका सभेत बोलताना नंदकुमार बघेल म्हणाले, मी भारतातील सर्व गावकºयांना आवाहन करतो की ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. मी इतर सर्व समुदायाशी देखील यांसंदर्भात बोलेल, जेणेकरून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकू. ब्राम्हणांना व्होल्गा नदीच्या तीरावर परत पाठवण्याची गरज आहे.
वडलांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, या देशात कायदा सर्वोच्च आहे आणि त्यांचे सरकार सर्वांसाठी आहे. कोणीही कायद्याच्या वर नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक धर्म, पंथ, समुदाय आणि त्यांच्या भावनांचा आदर करते.
माझे वडील नंदकुमार बघेल यांनी एका विशिष्ट समुदायाविरोधात टिप्पणी केली आहे. त्यांनी सांप्रदायिक शांतता भंग केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे मलाही दु: ख झाले आहे.माझे आणि माझ्या वडिलांचे राजकीय विचार आणि विश्वास वेगळे आहेत.
एक मुलगा म्हणून मी त्यांचा आदर करतो पण मुख्यमंत्री म्हणून मी त्यांची अशी चूक माफ करू शकत नाही, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडू शकते, असेही बघेल म्हणाले.
Chhattisgarh Chief Minister’s father says boycott Brahmins, police filed case agaist him
महत्त्वाच्या बातम्या
- महामारीशी लढण्यास अर्थव्यवस्था शिकली, अल्पावधीत रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल : आरबीआय एमपीसी सदस्य
- अमरुल्लाह सालेह यांचा ‘बचेंगे तो और भी लढेंगे’चा पवित्रा, गार्डला म्हणाले – “जखमी झालो, तर थेट माझ्या डोक्यात गोळी मारा”
- पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर
- Teachers Day : शिक्षकदिनी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांसह 44 जणांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपतींचे बोधप्रद भाषण, वाचा सविस्तर…