डेहराडून – देशातील भाविकांसाठी चार धाम यात्रेला शनिवारपासून (ता. १८) प्रारंभ होणार आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजुरी दिल्यानंतर उत्तराखंड सरकारने शुक्रवारी ही घोषणा केली. कोरोनाच सावट असल्याने यात्रेवर बंदी होती.Char Dham yatra begins from today
दोन्ही डोस घेतलेले तसेच कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असलेले भाविक वार्षिक यात्रेत भाग घेऊ शकतील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले की, सरकारने यात्रेची तयारी सुरु केली आहे. पर्यटन खाते लवकरच प्रमाणित दिशानिर्देश जारी करेल.
राज्याचे मुख्य सचिव डॉ. एस. एस. संधू यांनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. पर्यटनसह विविध खात्यांचे अधिकारी तसेच देवस्थान व्यवस्थापन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी आणि पौडी येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रस्ते सुरक्षा, स्वच्छता, गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, यात्रा मार्गावर चाचण्या आणि कोरोना नियमांची पुर्तता यासाठी सूचना देण्यात आल्या.
Char Dham yatra begins from today
महत्त्वाच्या बातम्या
- GST Council बैठकीचे निर्णय : स्विगी-झोमॅटोसारख्या अॅप्सवरून अन्न मागवणे महाग, काय-काय झाले स्वस्त? वाचा सविस्तर…
- पीएम मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव : पॅरालिम्पियन नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या रॅकेटसाठी 10 कोटी, नीरज चोप्राच्या भाल्यासाठी सव्वा कोटींची बोली
- सोनू सूदवर प्राप्तिकर छाप्याचा तिसरा दिवस, आयटी सूत्रांचा दावा – सोनूविरोधात कर गैरव्यवहाराचे अनेक पुरावे
- न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द : पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी घेतला निर्णय, पाक पीएम इम्रान खान यांचे प्रयत्नही अपयशी