• Download App
    भारताच्या चांद्रयानाची अवकाशात नासाच्या यानाशी होणारी टक्कर टळली । Chandryan Accident aveled in space

    भारताच्या चांद्रयानाची अवकाशात नासाच्या यानाशी होणारी टक्कर टळली

    वृत्तसंस्था

    बंगळूर : भारताच्या चांद्रयान-२ ची अमेरिकेच्या ‘एलआरओ’ या यानाशी अवकाशात होणारी टक्कर टळली, अशी माहिती इस्रोने दिली. २० ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ हा अंतराळातील अपघात टळला. Chandryan Accident aveled in space

    या घटनेपूर्वी आठवडाभर आधी इस्रो व अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने यासंदर्भात विश्वेषण केले. त्यानुसार, दोन्ही यानांच्या प्रतलातील अंतर १०० मीटरपेक्षाही कमी होणार असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्याचप्रमाणे, या यानांमधील प्रत्यक्षातील सर्वाधिक जवळचे अंतर तीन कि.मी.पेक्षाही कमी असेल, हेही लक्षात आले. इस्रो व नासाने ही संभाव्य टक्कर टाळण्यासाठी उपाय (सीएएम) वापरण्याचे ठरविले.



    त्यानुसार, १८ ऑक्टोबरला अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑक्टोबरला रात्री आठ वाजून २२ मिनिटांनी सीएएमची अमलबजावणी करण्यात आली. इस्रोने टक्कर टाळण्यासाठी ‘चांद्रयान २’ च्या ध्रवीय कक्षेत बदल करण्यात आला. ही दोन्ही याने साधारणत: एकाच ध्रुवीय कक्षेत चंद्राची परिक्रमा करतात. त्यामुळे, चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर ते एकमेकांजवळ येतात. चांद्रयान गेल्या दोन वर्षांपासून चंद्राची परिक्रमा करत आहे.

    Chandryan Accident aveled in space

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bijapur : बिजापूरमध्ये सैनिकांनी 4 नक्षलवाद्यांना ठार केले; मृतदेह-शस्त्रे जप्त, बासगुडा परिसरात अधूनमधून गोळीबार सुरू

    Mumbai Airport Terminal 1 : मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 बंद होणार; 10 कोटी प्रवासी नवी मुंबईकडे वळणार

    लोचटगिरीची हद्द… काँग्रेसचा नेता म्हणे, राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात !