installments of tax devolution : केंद्र सरकारने राज्य सरकारांना जे 47,541 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत 95,082 कोटी रुपयांचे कर हस्तांतरणाचे दोन हप्ते जारी केले आहेत. राज्यांना भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संसाधने एकत्रित करण्यास मदत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. Centre releases two installments of tax devolution to State Governments, See State-wise distribution of Net Proceeds of Union Taxes and Duties for November 2021
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य सरकारांना जे 47,541 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत 95,082 कोटी रुपयांचे कर हस्तांतरणाचे दोन हप्ते जारी केले आहेत. राज्यांना भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संसाधने एकत्रित करण्यास मदत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्यमंत्री, राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि विकास वाढवण्यासाठी व्हर्च्युअल बैठकीनंतर हे आश्वासन दिले होते, त्यानंतर आता त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सीतारामन यांनी तेव्हा गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि विकास वाढवण्याच्या गरजेवर भर दिला होता आणि राज्यांना कर वाटपाचे आगाऊ पेमेंट करण्यास सहमती दर्शवली होती.
जारी केलेल्या एकूण रकमेपैकी, उत्तर प्रदेशला सर्वाधिक 17,056.66 कोटी रुपये मिळाले आहेत. यानंतर बिहार राज्याचा क्रमांक लागतो, बिहारला ९५६३.३० कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय मध्य प्रदेशला 7463.92 कोटी रुपये, पश्चिम बंगालला 7152.96 कोटी रुपये आणि महाराष्ट्राला 6006.30 कोटी रुपये मिळाले आहेत.
Centre releases two installments of tax devolution to State Governments, See State-wise distribution of Net Proceeds of Union Taxes and Duties for November 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत गौरव’ ट्रेन सुरू होणार , खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील,देशातील पर्यटनाला मिळणार चालना ; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
- राहुलजींचे निकटवर्ती अशोक तंवर तृणमूल काँग्रेसमध्ये; त्यांनी बोलवले की ममता हरियाणात…!!
- नवाब मलिक यांनी शेअर केलेले चाटचे स्क्रीन शॉट फेक युजर आयडी वरून बनवलेले ; क्रांती रेडेकर
- गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल ; बैठकीतून कोणता मार्ग निघणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
- Mamata Banerjee : राजकारणी-लेखक सुधींद्र कुलकर्णी-जावेद अख्तर यांची ममता बॅनर्जींसोबत भेट ! काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश