विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) SC/ST/OBC/EWS/PwBD या कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. ह्या कॅटेगरी मधील इच्छुक उमेदवार कोणत्याही परीक्षा किंवा भरती संबंधि सर्व प्रश्नांसाठी 1800118711 या टोल फ्री क्रमांकावर यूपीएससी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या शंका विचारू शकतात.
Central Public Service Commission (UPSC) has a helpline number for candidates in SC / ST / OBC / EWS / PwBD category
अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (ईडब्ल्यूएस) आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी) या कॅटेगरी मधील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हा हेल्प लाइन क्रमांक अतिशय उपयुक्त असेल.
ह्या हेल्पलाईन मूळे upsc ची परीक्षा देत असणाऱ्या किंवा देण्याची इच्छा असणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे प्रश्न आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारणे, चर्चा करणे या साठी उपयुक्त असेल. ही हेल्पलाईन आठवड्यातील कामकाजाच्या दिवसांमध्येच चालू राहील.
आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, वरील प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही परीक्षा/ भरतीचे अर्ज भरण्यात किंवा आयोगाच्या परीक्षा/ भरतीसंबंधी कोणत्याही प्रश्नांसाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत असल्यास, या समर्पित हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधू शकतात. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार यूपीएससीची अधिकृत साइट तपासू शकतात.
Central Public Service Commission (UPSC) has a helpline number for candidates in SC / ST / OBC / EWS / PwBD category
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका
- Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!
- शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत
- Aryan Khan Drugs Case : एनसीबीच्या हाती ड्रग्जशी संबंधित आर्यनच्या चॅट्स, पार्टीच्या आधीही एका बड्या अभिनेत्रीशी चॅटिंग