• Download App
    खनिज संपत्तीचा शोध वाढवण्याचे केंद्राचे ओडिशा व इतर राज्यांना आवाहन|Central Govt. urges for mining to curb import

    खनिज संपत्तीचा शोध वाढवण्याचे केंद्राचे ओडिशा व इतर राज्यांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व आयात कमी करण्यासाठी खनिज संपत्तीचा शोध वाढविण्याचे आवाहन केंद्र सरकारने ओडिशासह अन्य शेजारील राज्यांना केले. खाण विभाग व ओडिशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनाही खनिज शोधण्यात सक्रिय भूमिका घेण्याचा तसेच त्यासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.Central Govt. urges for mining to curb import

    अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने भुवनेश्वरमधील कार्यशाळेत ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडतील खनिज शोध करता येणाऱ्या संभाव्य ठिकाणांबाबतही सादरीकरण केले. खाण मंत्रालयाने जीएसआय आणि खनिज अन्वेषण महामंडळाच्या सहाय्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती.



    खनिजांची वाढती मागणी कमी करण्यासाठी तसेच त्यांची आयात कमी करण्यासाठी खजिन संपत्तीचा शोध वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी खाण मंत्रालय राज्य सरकारांना शक्य ते सर्व सहकार्य करेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले. या कार्यशाळेत खनिज अन्वेषण महामंडळाच्या माध्यमातून यासंदर्भात प्रकल्प तयार करणे, मंजुरी व अंमलबजावणीबाबतही सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

    Central Govt. urges for mining to curb import

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार