प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 डीनोटिफाईड मालमत्ता ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या या डीनोटिफाईड मालमत्तांमध्ये मशिदी, कब्रस्तान आणि दर्ग्यांचा समावेश आहे. केंद्राच्या या निर्णयावर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनी सरकारला या मालमत्तांचा ताबा घेऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. Central government will take over 123 denotified properties of Delhi Waqf Board
मात्र या संदर्भात सरकारने नेमलेल्या समितीला समितीने वक्फ बोर्डाला या मालमत्ता संदर्भात कायदेशीर माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली होती परंतु वक्फ बोर्डाने सरकारी समितीला कायदेशीर माहिती दिली नाही. त्यामुळे सरकारने वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 123 डीनोटिफाईड मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
वक्फ बोर्डाच्या या मालमत्ता केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ताब्यात राहतील. या प्रकरणी भूमी आणि विकास अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी वक्फ बोर्डाला पत्र पाठवले होते. या पत्रात वक्फ बोर्डाच्या 123 डीनोटिफाईड मालमत्तांना सर्व प्रकरणांतून ‘मुक्त’ करण्याचे म्हटले आहे.
दिल्ली वक्फ बोर्डाच्या मालमत्तेतील या कारवाईबाबत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या भूमी आणि विकास कार्यालयाने म्हटले आहे की, निवृत्त न्यायमूर्ती एस. पी. गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांना दिल्ली वक्फ बोर्डाकडून कोणतेही आक्षेप मिळालेला नाही. भूमी आणि विकास कार्यालयाच्या पत्रानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने ही समिती स्थापन केली आहे.
Central government will take over 123 denotified properties of Delhi Waqf Board
महत्वाच्या बातम्या
- लो स्कोअरिंग मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाला सलग नमवून भारत गावस्कर – बॉर्डर ट्रॉफी विजेता!!
- शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घरापर्यंत आली असती; अमित शांहांनी शिवसृष्टीच्या लोकार्पणात सांगितली यशवंतरावांची आठवण
- महाकालाच्या उज्जैनमध्ये 21 लाख दिव्यांनी उजळला क्षिप्रा घाट
- हा शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या फोडाफोडीचा मुद्दा नाही, तर भाजपच्या नव्या राजकीय व्युहरचनेचा मुद्दा आहे!!
- बिहारमधल्या 45 आमदारांचे नेते नितीश कुमारांची भाजपला लोकसभा निवडणुकीत 100 जागांमध्ये गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा!!