• Download App
    जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा|Central government will fall when son-in-law goes to jail, Aap target on Gandhi family

    जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात भाजपाविरोधात विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसमधील घराणेशाहीचा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचे उद्योग आड येणार आहेत.Central government will fall when son-in-law goes to jail, Aap target on Gandhi family

    दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांची नियुक्ती केल्याने विधानसभेत भाजपावर टीका करताना आम आदमी पक्षाने कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे. जावई तुरुंगात जातील तेव्हा केंद्रातील सरकार पडेल, असे आपने म्हटले आहे.



    सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची केंद्र सरकारने दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. याविरोधात दिल्ली सरकारने विधानसभेत प्रस्ताव पारित केला. यावेळी आपचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, राकेश अस्थाना यांनी सीबीआय प्रमुख असताना एका पक्षाच्या जावयावर कारवाई केली.

    परंतू सर्वजणांना माहिती आहे की या जावयावर काय आणि किती कारवाई झाली. भाजपा आणि काँग्रेसची आतून सेटिंग आहे. ज्या दिवशी हे जावई तुरुंगात जातील, त्याचा आधीच भाजपाची सरकार पडेल.

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे उद्योजक पती रॉबर्ट वड्रा यांना जैन यांनी जावई संबोधले आहे. अस्थाना यांनी काही वर्षांपूर्वी रॉबर्ट वड्रा यांच्यावर काही गैरव्यवहारांवरून कारवाई केली होती. प्रियांका गांधी आणि वड्रा यांना काही वेळा चौकशीलाही हजेरी लावावी लागली होती.

    यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण शांत झाले. जैन यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधात दिल्ली विधानसभेत आज प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे.

    Central government will fall when son-in-law goes to jail, Aap target on Gandhi family

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!