• Download App
    पेट्रोलवरचे केंद्रीय उत्पादन शुल्क 8 रुपयांनी घटविले; पेट्रोल - डिझेल स्वस्त; गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान!!Central excise duty on petrol reduced by Rs 8; Petrol - Diesel cheaper

    महागाईच्या भडक्यावर उपाय : पेट्रोलवरचे केंद्रीय उत्पादन शुल्क 8 रुपयांनी घटविले; पेट्रोल – डिझेल स्वस्त; गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातली महागाई गगनाला भिडलेली असताना महागाईचा भडक्यावर कठोर उपाययोजना म्हणून केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल वरच्या केंद्रीय उत्पादन शुल्कात सात 8.00 रुपयांची घट केली असून घरगुती गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान जाहीर केले आहे. Central excise duty on petrol reduced by Rs 8; Petrol – Diesel cheaper

    केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. आज पासून पेट्रोल – डिझेलचे नवे दर लागू होतील. पेट्रोलवरचे केंद्रीय उत्पादन शुल्क 8.00 रुपयांनी कमी केल्यामुळे देशभरात पेट्रोल लिटरमागे 9.50 रुपयांनी कमी होईल, तर डिझेल 7.00 रुपयांनी कमी होईल.

    तसेच एका वर्षाला घरगुती गॅसचा 12 सिलेंडर वर 200 रुपये अनुदान केंद्र सरकार देईल. याचा प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे 9 कोटी कुटुंबांना थेट लाभ होईल, असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

    – सिमेंट, स्टील, प्लास्टिक वस्तू स्वस्त

    सिमेंट, स्टील हे अधिक उपलब्ध करून देण्यासाठी तसेच ते स्वस्त करण्यासाठी देखील केंद्र सरकार गंभीर उपाययोजना करत आहे, काही स्टील उत्पादनांच्या आणि प्लास्टिक उत्पादनांच्या कच्चा मालावर आयात शुल्क घटवले जात आहे तसेच काही स्टील उत्पादनांना अनुदान देखील दिले जाईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

    Central excise duty on petrol reduced by Rs 8; Petrol – Diesel cheaper

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vadodara : वडोदरामध्ये पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज