वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काहो लोक घरी, हॉटेल, रेस्टोरंटमध्ये वाढदिवस साजरा करतात. पण धावत्या रेल्वेमध्ये वाढदिवस साजरा करण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेकडून वाढदिवस असलेल्या व्यक्तीला भेटवस्तूही मिळणार आहे. ही संधी तेजस एक्स्प्रेमधून प्रवास करणाऱ्यांना दिली जाणार आहे. Celebrate birthday now in Tejas Express; Unique opportunity for railway passengers from IRCTC
दिल्ली ते लखनौ मार्गांवर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये IRCTCने अशा प्रकारचा उपक्रम राबविला आहे. कोरोनानंतर प्रथमच म्हणजे ६ ऑगस्टपासून तेजस सुरु करण्यात आली आहे. तेजस एक्स्प्रेसमध्ये अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची संधी IRCTC ने प्रवाशांना दिली आहे. विशेष म्हणजे लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला भेटवस्तू ही जिंकण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही जेव्हा तिकीट खरेदी कराल तेव्हा तुम्ही लकी ड्रॉसाठी आपोआप पात्र होता. भेटवस्तू देण्याची योजना २७ ऑगस्टपासून सुरु केली असून ती ६ सप्टेंबरपर्यंत लागू आहे.
तेजस ही भारतातील पहिली खासगी रेल्वे आहे. प्रवाशांना आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विमानात जशी सेवा मिळते तशी ती दिली जाते. आता तेजसकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. त्या योजनेचाच एक भाग म्हणजे वाढदिवस रेल्वेत साजरा करणे होय.
आजप आजपर्यंत १३ पेक्षा जास्त लोकांनी भेटवस्तू जिंकल्या आहेत. दिवसाला १३ जणांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. दिल्ली – लखनौ मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये ही लकी ड्रॉ ची योजना लागू असूनतिकीट खरेदी केल्यावर प्रत्येक प्रवासी त्यासाठी पात्र ठरतो. प्रवाशाच्या PNR number च्या आधारे लकी ड्रॉ काढला जातो. १३ लकी प्रवसी भेटीवस्तूसाठी निवडले जातात. भेटवस्तू मिळवा आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करा, अशी ही कल्पना आहे. पण, त्यासाठी तुम्हाला तिकीट काढून आपला वाढदिवस आहे, हे मात्र IRCTC कळवावे लागणार आहे.
Celebrate birthday now in Tejas Express; Unique opportunity for railway passengers from IRCTC
महत्त्वाच्या बातम्या
- संकटाचा आवाज : ओसामा बिन लादेनचा माजी सहाय्यक अमीन-उल-हक अफगाणिस्तानात परतला, पाकिस्तानमध्ये घालवली 20 वर्षे
- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एप्रिलच्या तुलनेत लसीचे उत्पादन दुप्पट करणार
- मेक इन इंडियाला बळ, लष्कर खरेदी करणार आकाश, ध्रुव, 14 हजार कोटींचा सौदा
- सचिन वाझेला भीती कोठडीतील मृत्यूची, फादर स्टॅन स्वामीप्रमाणे मृत्यू येऊ नये म्हणून मागितले तातडीचे उपचार