• Download App
    जनरल बिपिन रावत : गढवाली रजपूत शौर्य परंपरेतले आक्रमक नेतृत्व!!; लष्करी आधुनिकीकरणाचे, सुधारणांचे अध्वर्यू!!|CDS General Bipin Rawat : military structural reformer

    जनरल बिपिन रावत : गढवाली रजपूत शौर्य परंपरेतले आक्रमक नेतृत्व!!; लष्करी आधुनिकीकरणाचे, सुधारणांचे अध्वर्यू!!

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’च्या (सीडीएस) पहिल्या प्रमुख पदासाठी सर्वांत आघाडीवर नाव होते, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे!! तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांच्या समितीच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड झाली.CDS General Bipin Rawat : military structural reformer

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास तसेच मूळचे पौडी गढवालचेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी असलेला समन्वय यातून जनरल बिपिन रावत हे भारतीय लष्करी सुधारणांचे सर्वात मोठे अध्वर्यू ठरले आहेत.



    भारताचा विस्तार आणि संरक्षण विषयक गरजा लक्षात घेता भारतीय सैन्य दलाला एकच प्रमुख हवा हा विचार गेल्या ५० वर्षांपासून सरकारी पातळीवर विचाराधीन होता. पण तो अमलात येत नव्हता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने तो प्रथम अमलात आणला.

    तो आणतानाच भारतीय लष्करात रचनात्मक सुधारणा करण्याचा करण्याची योजनाही तयार करण्यात आली. तिचे नेतृत्व जनरल बिपिन रावत यांनी केले. पौडी गढवालची शौर्य परंपरा हा अजित पवार आणि जनरल बिपिन रावत यांच्यातला समान दुवा…!!

    मूळचे उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथील असणाऱ्या बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मणसिंह रावत हेही लष्करात वरिष्ठ अधिकारी होते. १९८८ मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. रावत यांनी वडिलांच वारसा पुढे नेत म्हणजे, ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून आपली लष्करी सेवेची कारकीर्द पुढे सुरू केली. चार दशकांच्या कारकीर्दीत विविध आघाड्यांवर कामगिरी बजावली.

    त्यांच्याकडे २०१६मध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाची जबाबदारी होती आणि काही महिन्यांत म्हणजे ३१ डिसेंबर २०१६ रोजी ते लष्करप्रमुख झाले. त्यावेळी प्रवीण बक्षी आणि पी. एम. हारिझ या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून झालेली रावत यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती.

    रावत हे सडेतोड, आक्रमक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या काळात लष्करातील पुनर्रचनेला त्यांनी दिलेली गती ही सर्वांत महत्त्वाची बाब ठरली. लष्कराचे आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भर भारत योजनेतूनच शस्त्रास्त्रे – सामग्रीची निर्मिती – खरेदी यावर त्यांनी कायम भर दिला.

    देशाच्या संरक्षण धोरणातले ते आमूलाग्र बदलाचे ते नुसते साक्षीदार नव्हे, तर ते मुख्य कार्यवाहक आहेत. चीन विरुद्ध लडाखमध्ये झालेला संघर्ष त्यातून भारतीय सैनिकांनी चीनच्या सैनिकांना दिलेले अत्यंत वरचढ असे उत्तर हे भारतीय सैन्य आक्रमक झाल्याचे द्योतक आहे.

    हा धोरणात्मक बदल जनरल बिपिन रावत यांच्या लष्करप्रमुख पदाच्या तसेच संरक्षण दल प्रमुख पदाच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा क्षण आहे. भारतीय लष्कराला आवश्यक असणारी सर्व सामग्री भारतातच तयार व्हावी. इतकेच नाही तर भारत संरक्षण सामग्री निर्यात करणारा अव्वल देश बनावा हे सरकारचे धोरण राबविण्यात बिपिन रावत हे प्रत्यक्षात आघाडीवर राहिले आहेत.

    देशातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरींचे रूपांतर केंद्रातील मोदी सरकारने सात कंपन्यांमध्ये केले. त्यांना 65 हजार कोटी रुपयांच्या लष्करी सामग्रीच्या पहिल्या ऑर्डर्स दिल्या. या सगळ्याचा आराखडा जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे.

    भारतीय लष्कराला बबचावात्मकतेतून बाहेर काढून पूर्णपणे आक्रमक आणि शत्रु राष्ट्राच्या भूमीत घुसून त्यांचा खात्मा करण्याची ताकद देण्याचे काम जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. देशाच्या संरक्षण धोरणात संपूर्णपणे बचावात्मक पवित्र्यापासून ते संपूर्ण आक्रमक पवित्र्यापर्यंतचा बदल बिपिन रावत यांनी आपल्या संपूर्ण लष्करी पेशात अनुभवला किंबहुना ते त्याचे प्रमुख कार्यवाहक ठरले आहेत…!!

    CDS General Bipin Rawat : military structural reformer

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य