वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय 3 एप्रिल रोजी आपल्या स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी टपाल तिकीट आणि डायमंड ज्युबिली मार्क असलेले नाणेही जारी करतील. यावेळी मोदी सीबीआयच्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांचाही सन्मान करणार आहेत. यासोबतच राष्ट्रपती पोलीस पदकासाठी ज्या अधिकाऱ्यांची नावं निवडली गेली, त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.CBI’s Diamond Jubilee event today, PM Modi to release postal stamp and coin, also launch agency’s Twitter handle
हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता विज्ञान भवन, दिल्ली येथे होणार आहे. कार्यक्रमात मोदी मेघालयची राजधानी शिलाँग, महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर येथील सीबीआयच्या शाखा कार्यालयांच्या नवीन इमारतींचे उद्घाटनही करणार आहेत.
सीबीआयचे ट्विटर हँडल सुरू करणार
सीबीआयची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी झाली. सीबीआय आता प्रथमच ट्विटर या सोशल मीडिया नेटवर्कमध्ये प्रवेश करणार आहे. पीएम मोदी सीबीआयच्या ट्विटर हँडलचे उद्घाटन करतील. यासोबतच तपास यंत्रणेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून अनेक सूचना आणि तक्रारीही मिळतील.
सीबीआयने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये इंटरपोलच्या महासभेदरम्यान ट्विटरवर पहिल्यांदा हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी आयकॉनिक ब्लू टिक असलेले एक हँडल सुरू करण्यात आले.
ट्विटर हँडल लाँच केल्याने तपास यंत्रणेला भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात मदत होईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनाही त्यांची मते थेट तपास यंत्रणेपर्यंत सहज मांडता येतील.
CBI’s Diamond Jubilee event today, PM Modi to release postal stamp and coin, also launch agency’s Twitter handle
महत्वाच्या बातम्या
- रामनवमीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचारावर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतापले, म्हणाले…
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा केजरीवालांवर जोरदार पलटवार म्हणाले…
- Jaishankar On Khalistan: ‘आता तो भारत नाही जो तिरंग्याचा अपमान सहन करेल’, ब्रिटनमधील ‘त्या’ घटनेवर जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया
- CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!