• Download App
    चाईल्ड पार्नोग्राफीप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, एकाचवेळी १४ राज्यांमध्ये छापे CBI raids in 76 places CHILD PORNOGRAPICS

    चाईल्ड पार्नोग्राफीप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, एकाचवेळी १४ राज्यांमध्ये छापे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – सीबीआयने देशातील १४ राज्यांत ७६ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, राजस्थान आदी राज्यांचा यात समावेश आहे. मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे करणाऱ्या व इंटरनेटवर यासंदर्भातील आक्षेपार्ह साहित्य पोस्ट करणाऱ्या ८३ जणांवर सीबीआयने कारवाई केली.CBI raids in 76 places CHILD PORNOGRAPICS



     

    राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) माहितीनुसार देशभरात मुलांविरुद्धच्या सायबर क्राईममध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ४०० टक्के वाढ झाली. यात प्रामुख्याने मुलांविषयी लैंगिक साहित्य प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

    काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश यू.यू.ललित यांनीही केवळ बाल तस्करी व बाल शोषणावर लक्ष देण्याऐवजी चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गुन्ह्यावरही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती.

    CBI raids in 76 places CHILD PORNOGRAPICS

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!