वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या तारा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची सीबीआय मुख्यालयात चौकशी सुरू आहे. पण बाहेर दिल्ली राज्यभर आम आदमी पार्टी शक्ती प्रदर्शन करत आहे. यासाठी सध्या तुरुंगा बाहेर असलेले दिल्लीचे सगळे मंत्रिमंडळ, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळ, आम आदमी पार्टीचे आमदार – खासदार दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. CBI probe of Kejriwal in liquor scam
तिकडे पंजाब मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत आणि तरी पंजाबला वाऱ्यावर सोडून तिथले आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री भगवंत मान आपल्या मंत्रिमंडळा सकट दिल्लीच्या रस्त्यावर शक्तिप्रदर्शनासाठी उतरले आहेत.
सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी कालच भाजप सरकारवर आरोपांची राळ उडवली होती. आज प्रत्यक्ष सीबीआय मुख्यालयात जाताना, आम्ही भाजपचा मुकाबला करू. सीबीआय जे प्रश्न विचारतील त्यांना उत्तरे देऊ आणि अंतिम विजय आमचाच असेल, असा दावा केजरीवालांनी केला आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी केजरीवाल यांना श्रीकृष्णाची उपमा दिली आहे. कंसाने श्रीकृष्णाचा छळ केला, पण तो त्याचा केसही वाकडा करू शकला नाही. उलट नंतर श्रीकृष्णानेच कंसाचा वध केला, तसेच आम्ही देखील करू, असा दावा राघव चढ्ढा यांनी केला आहे.
* काँग्रेसच्या पावलावर आपचे पाऊल*
गुजरात मध्ये राहुल गांधींच्या सुरत कोर्टामधील हजेरीच्या वेळी काँग्रेसने सुरत मध्ये शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचेच रिपीटेशन केजरीवालांच्या सीबीआय चौकशीच्या वेळी आम आदमी पार्टीने दिल्लीत केले आहे. या दारू घोटाळ्यात आधीच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगाच्या वाऱ्या करत आहेत. दिल्लीचे दुसरे मंत्री सत्येंद्र जैन हे देखील तिहार जेलची हवा खात आहेत.
त्यानंतर आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागला आहे. सीबीआय आजच्या दिवसभराच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवालांना ताब्यात घेण्याची किंवा थेट अटक करण्याची दाट शक्यता आहे.
अण्णांची परखड भूमिका
दारू घोटाळ्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील परखड प्रतिक्रिया व्यक्त केले असून ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा वापर स्वतःचे राजकीय लॉन्चिंग करून घेण्यासाठी केला, त्या व्यक्तीनेच भ्रष्टाचार केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी परखड भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली आहे.
CBI probe of Kejriwal in liquor scam
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत
- अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!
- प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!
- BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!