• Download App
    मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी डोमिनिकामध्ये आहेत सीबीआयच्या या दबंग महिला अधिकारी । cbi officer sharda raut Leading to catch fugitive businessman mehul choksi om Dominica, choksi extradition to india

    मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी डोमिनिकामध्ये आहेत सीबीआयच्या या डॅशिंग महिला अधिकारी

    cbi officer sharda raut :  पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकीचा आरोप असणाऱ्या मेहुल चोकसीला डोमिनिकाच्या कोर्टाने भारताकडे सुपूर्द केले तर या प्रकरणातील तपास अधिकारी शारदा राऊत त्याला पुन्हा दिल्लीला आणतील. त्या डोमिनिकामध्ये हजर असलेल्या सीबीआय टीमच्या हेड आहेत. मेहुल चोकसीला पकडण्यासाठी शारदा राऊत ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत. cbi officer sharda raut Leading to catch fugitive businessman mehul choksi om Dominica, choksi extradition to india


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकीचा आरोप असणाऱ्या मेहुल चोकसीला डोमिनिकाच्या कोर्टाने भारताकडे सुपूर्द केले तर या प्रकरणातील तपास अधिकारी शारदा राऊत त्याला पुन्हा दिल्लीला आणतील. त्या डोमिनिकामध्ये हजर असलेल्या सीबीआय टीमच्या हेड आहेत. मेहुल चोकसीला पकडण्यासाठी शारदा राऊत ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तिथल्या कोर्टाने मेहुल चोकसीला त्यांच्या देशातून हद्दपार करण्याचा आदेश दिला तर सीबीआयची टीम मेहुलला एका खासगी विमानातून दिल्लीला आणेल. शारदा राऊत भारतीय भूमीवर उतरल्यानंतर त्याला अटक करतील. बुधवारी सुनावणीदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी डोमिनिकन अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका घेतल्याचेही वृत्त माध्यमांनी दिले आहे. मेहुलच्या गुन्हेगारी कारवायांच्या तपशिलासह ईडीचे प्रतिज्ञापत्र बुधवारी सायंकाळपर्यंत डोमिनिकन कोर्टात दाखल केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये तो भारतीय नागरिक कसा आहे आणि कोणत्या आधारावर त्याला भारतात प्रत्यार्पित केले जावे हे सांगण्यात येईल.

    डोमिनिकन वकिलांमार्फत ईडी आणि सीबीआय तेथील कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे की, ही कोठडीतील व्यक्ती जानेवारी 2018 पासून भारतातला वाँटेड आरोपी आहे. इंटरपोलच्या रेड नोटिशीच्या आधारे त्याला त्वरित भारतात परत पाठवावे. दरम्यान, मेहुल चोकसीला नोव्हेंबर 2017 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व देण्यात आले होते. असे असूनही त्याने कधीही भारतीय नागरिकत्व सरेंडर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि आजही तो भारतीय नागरिक आहे.

    केंद्रीय आर्थिक अन्वेषण यंत्रणा डोमिनिकामध्ये उपस्थित असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांसह भारतीय अधिकार्‍यांशी संपर्क साधत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे आणि त्यांनी मेहुल चोकसीविरुद्ध ठोस पुरावे दिले आहेत. डोमिनिकामधील चोकसीचे प्रकरण कायदेशीर अडचणीत येऊ नये, यासाठी एजन्सीचे अधिकारी प्रयत्न करत आहेत, अन्यथा भारताला बरीच प्रतीक्षा करावी लागेल.

    cbi officer sharda raut Leading to catch fugitive businessman mehul choksi in Dominica, choksi extradition to india

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य