• Download App
    महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे |CBI enqiry in Mahant case

    महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे.CBI enqiry in Mahant case

    केंद्र सरकारने त्यासाठी मंजुरी दिल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारतर्फे तशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तशी सूचना केली होती.



    बाघम्बरी मठात सोमवारी नरेंद्रगिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी दुसऱ्या दिवशी १८ सदस्यांचे विशेष तपास पथक तयार केले होते. मात्र विरोधी पक्षांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

    गेले तीन दिवस साऱ्या राज्यात या प्रकरणावरून उलट सुलट चर्चा सुरु होती. अखेर राज्य सरकारने महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.

    CBI enqiry in Mahant case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती