वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात सीबीआयने अखेर अटक केली आहे. तत्पूर्वी आज सकाळी 11.00 वाजल्यापासून मनीष सिसोदिया यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 8 तास चौकशी केली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. CBI arrests Delhi Deputy CM Manish Sisodia in excise policy case
सीबीआयच्या कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वीच मनीष सिसोदिया यांनी वेगवेगळे ट्विट करून आपल्याला आज अटक होण्याची शक्यता आहे, असे भाकीत वर ठेवले होते. त्यानंतर आम आदमी पार्टीने दिल्ली ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांचा जमावडा जमावला होता. त्यापैकी काही महिला कार्यकर्त्यांनी दिल्लीतील फतेहपुर बेरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करताना “मर गया मोदी”, “मर गया मोदी” अशा घोषणा दिल्या. आम आदमी चे कार्यकर्ते नीरज यांनी या घोषणांचे समर्थन केले.
दरम्यानच्या काळात मनीष सिसोदिया यांची सीबीआयचे अधिकारी चौकशी करत होते. अखेर दुपारनंतर सिसोदिया यांनी घरून जेवण मागवले त्याचवेळी त्यांच्या अटकेची शक्यता असल्याचे निदर्शनास आले.
दिल्लीतील दारू दुकानांचे परवाने ते उत्पादनाचे परवाने देताना सिसोदिया यांनी तब्बल 10000 कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क बुडवले. त्या पैशाची अफरातफर केली. यासंदर्भातली कागदपत्रे नष्ट करून महत्त्वाचे पुरावे देखील संपवून टाकले असा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात सीबीआयचे अधिकारी उद्याच मनीष सिसोदिया यांना सीबीआय कोर्टात हजर करणार आहेत.
दारू घोटाळ्याच्या तारा तेलंगणात
दारू घोटाळ्याच्या तारा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांची कन्या आमदार के. कविता यांच्यापर्यंत देखील पोहोचल्या आहेत. मध्यंतरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याच घोटाळ्यासंदर्भात त्यांची दिल्लीत चौकशी केली होती. आज मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर या पुढची कारवाई सीबीआय दिल्ली केंद्रित करणार की दारू घोटाळ्याचे आणि परवाना वाटपाचे धागेदोरे देशात अन्यत्र शोधणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
शिक्षणाची क्रांती, सिसोदियांचे महिमा मंडन
याच दरम्यान आम आदमी पार्टीने मनीष सिसोदिया यांचे समर्थन करताना त्यांना दिल्लीच्या शिक्षणाक्षेत्रात क्रांती आणणारे नेते असे संबोधले आहे. भाजप सरकार नुसतेच 10000 कोटींच्या दारू घोटाळ्याविषयी बोलत राहिले. परंतु, त्यांना एकही पुरावा सापडला नाही. गेल्या 8 महिन्यांमध्ये मनीष सिसोदिया यांच्यासह अनेकांची सीबीआयने चौकशी केली. परंतु, त्यांना पुरावे सापडले नाहीत, असा दावा आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या आतिशी यांनी केला आहे.
CBI arrests Delhi Deputy CM Manish Sisodia in excise policy case
महत्वाच्या बातम्या
- कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही; तरी सुप्रिया सुळेंकडून दिशाभूलीचे ट्विट; दादा भुसेंचीही अजब मागणी
- लंडनहून येऊन तरुणीने कसब्यात बजावला मतदानाचा हक्क; पण राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटलांनी केला गोपनीयतेचा भंग!!
- काँग्रेस अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस : राहुल गांधी आणि खरगे यांचे भाषण; त्यानंतर दुपारी 3 वाजता मेगा रॅली