• Download App
    बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप|CBI arrests 3 railway employees in Balasore train accident case, charges of culpable homicide and destruction of evidence

    बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे गेल्या महिन्यात झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनीअर अरुणकुमार मोहंता, सेक्शन इंजिनीअर मोहम्मद अमीर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे.CBI arrests 3 railway employees in Balasore train accident case, charges of culpable homicide and destruction of evidence

    या तिघांवरही सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. या अपघातात 293 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

    या तिघांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे तिन्ही आरोपींना माहिती होते, असा दावाही सूत्रांनी केला आहे.



    अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) गेल्या आठवड्यात अपघातासाठी सिग्नलिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानवी चुकांना जबाबदार ठरवले होते.

    पहिल्या सीआरएस अहवालात काय होते

    बालासोर दुर्घटनेच्या CRS अहवालात सिग्नल आणि दूरसंचार विभागातील अनेक स्तरावरील त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सिग्नल सर्किट डायग्राममध्ये बिघाड झाला नसता तर 293 प्रवाशांना जीव गमवावा लागला नसता. भविष्यात यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी 14 मुद्यांवर CRS ने शिफारस केली आहे.

    अहवालाचा निष्कर्ष

    साउथ ईस्ट सर्कल कोलकाता चे सीआरएस एएम चौधरी यांनी तपास अहवालात सांगितले की, सिग्नल सर्किटच्या डायग्राममधील त्रुटींमुळे कोरोमंडल एक्सप्रेसचा चुकीचा सिग्नल क्रॉसिंग गेट क्रमांक-94 जवळ आला होता. अप मेन लाईन ते अप लूप लाईन क्रॉस ओवर 17A/B ला जोडणारा क्रॉस ओव्हर लूप लाईनवर सेट केला होता. चुकीच्या सिग्नलमुळे कोरोमंडल एक्स्प्रेस अप लूप मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळे तेथे उभी असलेली मालगाडी वॅगनला धडकली.

    52 मृतदेह अद्याप बेवारस

    ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातानंतर 52 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हे मृतदेह भुवनेश्वर एम्स कॅम्पसमध्ये डीप फ्रीज कंटेनरमध्ये ठेवण्यात आले आहेत.

    6 जून रोजी 81 मृतदेहांचे डीएनए नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. शुक्रवारी यातील 30 नमुन्यांचे अहवाल आले असून 29 मृतांची ओळख पटली आहे. हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

    या प्रकरणात, रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की काही मृतदेह असे आहेत की त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त दावेदार आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील डीएनए नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

    CBI arrests 3 railway employees in Balasore train accident case, charges of culpable homicide and destruction of evidence

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी