• Download App
    भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने रचला नवीन इतिहास! सर्वाधिक २०००० धावांचा विक्रम | Captain of india's women cricket team has set new record of 20000 runs

    भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने रचला नवीन इतिहास! सर्वाधिक २०००० धावांचा विक्रम

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई: भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने नवीन इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मितालीने ६१ धावांची खेळी केली आणि नवीन विक्रम रचला गेला. एकदिवसीय क्रिकेट सामने आणि टेस्ट क्रिकेट सामने मिळून मितालीने आजवर २०००० धावांचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव महिला क्रिकेटर बनली आहे.

    Captain of india’s women cricket team has set new record of 20000 runs

    एकूण २१७ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधून तिने ७३०४ धावा केल्या आहेत. तर ११ कसोटी सामन्यांमध्ये ६६९ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यांमधील तिचा आजवरचा हायेस्ट स्कोअर आहे २१४. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मितालीने एकूण २३६४ इतक्या धावा बनवल्या आहेत. टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये एकूण १७ अर्धशतके झळकावली आहेत. तर स्थानिक क्रिकेटमध्येही मितालीने नेहमीच धावांचा डोंगर रचला आहे. या सर्व प्रकारांमध्ये तिने एकूण २०००० धावा पूर्ण केल्या आहेत. तिच्या या विक्रमाबद्दल बीसीसीआयने तिचे विशेष अभिनंदन केले आहे.


    MITALI RAJ : जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राजचे राज्य ; अव्वल नंबर मितालीसह दक्षिण अफ्रिकेच्या लिजेली लीची बाजी


    १९९९ मध्ये मितालीने भारताकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. मागील २२ वर्षांमध्ये तिने आपल्या खेळाचे जबरदस्त प्रदर्शन नेहमीच केले आहे. सर्वात जास्त धावांचा विक्रम करण्यासोबतच तिने आणखी एक विक्रम केला आहे. तो म्हणजे सर्वात जास्त काळ एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द खेळलेली ती दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरली आहे. सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणारा क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. आणि त्याच्यानंतर होता श्रीलंकेचा सनथ जयसूर्या. आता मितालीने सनथ जयसूर्याला मागे टाकून या यादीमध्ये दुसरा नंबर पटकावला आहे.

    Captain of india’s women cricket team has set new record of 20000 runs

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!