• Download App
    टोमॅटो, हिरव्या मिरचीच्या पाठोपाठ ढोबळीही रस्त्यावर ; शेतकऱ्याला घाऊक बाजारात मिळाला किलोला दोन रुपये भाव। capsicum also thrown by the farmer on the road After Tomatoes, green pepper ; In the wholesale market the price was Rs 2 per kg

    टोमॅटो, हिरव्या मिरचीच्या पाठोपाठ ढोबळीही रस्त्यावर ; शेतकऱ्याला घाऊक बाजारात मिळाला किलोला दोन रुपये भाव

    वृत्तसंस्था

    इंदापूर : टोमॅटो, हिरव्या मिरचीच्या पाठोपाठ ढोबळी मिरची शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली आहे. ढोबळीला किलोमागे केवळ दोन रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने हा प्रकार केला. capsicum also thrown by the farmer on the road After Tomatoes, green pepper ; In the wholesale market the price was Rs 2 per kg

    शेतक ऱ्यांनी टोमॅटो, हिरवी मिरची रस्त्यावर फेकून निषेध केल्याच्या घटना राज्यात घडत असताना  ढोबळी मिरचीला घाऊक बाजारात दोन रुपये किलो असा भाव मिळाला. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरमधील शेतकऱ्याने ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध केला.



    कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारावर परिणाम झाला आहे. संसर्ग आणि थकीत वीजदेयके यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने ते टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध करत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील शेतकरी खंडू राजगुरू यांनी शेतात तीन एकरांवर ढोबळीची लागवड करण्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले.

    इंदापूर शहरातघाऊक बाजारात प्रतिकिलो दोन रुपये असा भाव मिळाल्याने राजगुरू निराश झाले. महामार्गावर त्यांनी नागरिकांना ढोबळी मिरची वाटली. नागरिकांकडून त्यांनी पैसेही घेतले नाही. उर्वरित ढोबळी मिरची त्यांनी सोलापूर मार्गावर फेकून दिली.

    capsicum also thrown by the farmer on the road After Tomatoes, green pepper ; In the wholesale market the price was Rs 2 per kg

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार