वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन पुतिन यांना हुकूमशहा म्हणाले पण त्याच वेळी रशिया युक्रेन युद्धात उतरायला अमेरिकेने नकार दिला आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, त्यामध्ये अमेरिकेचे सैन्य प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, याउलट अमेरिका युक्रेनला 1 बिलियन डॉलर आर्थिक मदत करेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या संसदेतील भाषणात केली. Calling Putin a “dictator”, Biden said the United States would not enter the Russia-Ukraine war !!
मागील ७ दिवस हे युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणू हल्ला करण्याचा विचार सुरु केला आहे, अशा वेळी सर्वांच्या नजरा अमेरिकेकडे लागल्या होत्या, बुधवारी, २ मार्च रोजी जो बायडेन यांनी भाषण केले आणि त्यांनी अमेरिका युद्धात उतरणार नाही, अशी घोषणा केली.
पुतिन हुकूमशहा!
६ दिवसांपूर्वी पुतीन यांनी मोठी चूक केली आहे, त्यांची मनमानी आणि हुकूमशाही कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावले आहेत. तसेच अमेरिकेने रशियाच्या विमानांना अमेरिकेच्या अवकाशात प्रतिबंध लावला आहे. अजूनही प्रतिबंध आम्ही कडक करणार आहोत, असेही जो बायडेन म्हणाले.
या सर्व परिस्थितीत युरोपियन देश आणि पश्चात्त देश संघटित राहिले, त्यांच्या एकजुटीमुळेच रशिया कमकुवत झाला. रशियाचा शेअर बाजार ४० टक्क्यांनी घसरला आहे. रशियाला या युद्धाचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर खरे तर असे पाऊल उचलणे चुकीचे होते, पण पुतिन यांनी ते उचलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असेही बायडेन म्हणाले.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचे कौतुक
या युद्धात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनी जी हिमंत दाखवली, युक्रेनच्या जनतेने जो प्रतिकार केला याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्यांच्या मागे नाटो, अमेरिका आणि युरोपियन देश खंबीरपणे उभे आहेत, असेही बायडेन म्हणाले.
Calling Putin a “dictator”, Biden said the United States would not enter the Russia-Ukraine war !!
महत्त्वाच्या बातम्या
- पब्जी गेमचा नाद ठरला घातक; किरकोळ कारणावरून ठाण्यात मित्राची केली हत्या
- कायदा सचिव पदावर नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातील प्रॅक्टिसिंग वकिलही पात्र
- राम सेतू ही दंतकथा नाही, तो असल्याचे पुरावे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
- एमबीबीएसच्या ७ हजार भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात बँकेचे कर्ज घेऊन युक्रेन मध्ये प्रवेश; अनिश्चितमुळे मोठे संकट