वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण बदल केला असून विद्यमान कायदेमंत्री किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून बाजूला करून त्यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे, तर रिजीजू यांच्याकडील कायदे मंत्रालयाचा कार्यभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपविला आहे. राष्ट्रपती भवनातून या संदर्भात पत्रक जारी करण्यात आले.Cabinet reshuffle: Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as Union Law Minister
केंद्रीय मंत्रिमंडळात अरुणाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करत असलेले किरण रिजीजू पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी मानले जातात पण त्यांच्यात आणि न्यायव्यवस्था यांच्यात गेल्या काही दिवसात फार सौहार्द पूर्ण संबंध राहिले नव्हते. न्यायाधीशांची कॉलेजियम पद्धतीची निवड, प्रलंबित असलेले खटले याविषयी किरण रिजीजू यांनी काही परखड मते व्यक्त केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर किरण रिजीजू यांच्या खाते बदलाकडे राजकीय वर्तुळात पाहिले जात आहे.
Cabinet reshuffle: Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as Union Law Minister
महत्वाच्या बातम्या
- अखेर कर्नाटकचं नाटक संपलं! सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार यांची ‘या’ पदावर बोळवण
- द फोकस एक्सप्लेनर : कसा होतो हिंडेनबर्गचा रिपोर्ट, अमाप कमाई करणारे कोण आहेत नॅथन अँडरसन? वाचा सविस्तर
- राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील
- CBI Summons : समीर वानखेडेला CBI कडून चौकशीसाठी समन्स, आर्यन खानशी संबंधित प्रकरण