वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात फास्टॅगला आता बायबाय करण्यात येणार असून जीपीएस ट्रेकिंगद्वारे टोलवसुली केली जाणार आहे. याबाबतच्या देशात चाचण्या सुरू झाल्या असून लाखो वाहनांचा सहभाग घेतला आहे. सुमारे १.३७ लाख वाहनांचा चाचण्यांत सहभाग घेतल्याचे वृत आहे. Bye bye to Fastag now; Toll collection by GPS; Tests begin in the country; Involvement of millions of vehicles
फास्टॅगचा जागी जीपीएस ट्रॅकिंगद्वारे टोलवसुलीची नवी यंत्रणा आणली जाईल, ती काही युरोपीय देशांत यशस्वी झाली आहे. तिला ‘सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम’ म्हणतात. ती लागू केल्यानंतर देशभरातून टोल प्लाझा हटवले जातील. सरकारने २०२० मध्येच दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये व्यावसायिक ट्रकमध्ये ऑन बोर्ड युनिट व इस्रोच्या नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमच्या मदतीने एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला होता, तो यशस्वी ठरला आहे.
आता केंद्र सरकारने नवी यंत्रणा लागू करण्यासाठी काही चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यात देशभरातील १.३७ लाख वाहनांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात ३८,६८०, दिल्लीत २९,७०५, उत्तराखंडमध्ये १४,४०१, छत्तीसगडमध्ये १३,५९२, हिमाचल प्रदेशात १०,८२४ आणि गोव्यात ९,११२ वाहनांचा चाचण्यांत समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, मणिपूर, सिक्कीम आणि लडाखमध्ये सध्या प्रत्येकी एका वाहनावर चाचणी सुरू आहे.
Bye bye to Fastag now; Toll collection by GPS; Tests begin in the country; Involvement of millions of vehicles
महत्त्वाच्या बातम्या
- Hindu Minorities : काही राज्यांत हिंदूंना देखील अल्पसंख्यांक दर्जा आणि अधिकार द्यावा; केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र!!
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर