• Download App
    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात कारवाई; पाकिस्तानातून आलेली 2000 कोटींची ड्रग्स पकडली!!|Bureau of Narcotics Control operations at sea with the help of the Navy; Drugs worth Rs 2000 crore seized from Pakistan

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात कारवाई; पाकिस्तानातून आलेली २००० कोटींची ड्रग्स पकडली!!

    प्रतिनिधी

    मुंबई : पाकिस्तानातून भारतात समुद्र मार्गाने मच्छिमार बोटीतून आलेल्या सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 2000 हजार कोटी रुपयांची ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत.Bureau of Narcotics Control operations at sea with the help of the Navy; Drugs worth Rs 2000 crore seized from Pakistan

    या जप्तीमुळे देशातील आणि देशाबाहेरील ड्रग्स सिंडिकेटला धक्का बसला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्समध्ये ५२९ किलो अत्यंत उच्च दर्जाचे चरस, २३४ किलो उत्कृष्ट दर्जाचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन काही प्रमाणात हेरॉईनचा समावेश आहे. हा एकूण 756 किलो ड्रग्जचा साठा आहे. या सर्वांची आंतरराष्ट्रीय बाजारात 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली आहे.



    पाकिस्तान देशातून  समुद्र मार्गाने मच्छिमार बोटीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा भारतात आणला जात असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ला मिळाली होती. एनसीबीने भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाला सूचना दिली. भारतीय नौदल आणि एनसीबीकडून संयुक्तरित्या ऑपरेशन राबविण्यात आले. या दोन्ही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भरसमुद्रात या मच्छिमार बोटी ताब्यात घेऊन सुमारे ७६५ किलो ड्रगचा साठा जप्त केला.

    भर समुद्रात ही पहिलीच कारवाई

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केलेली ही सर्वात मोठी ड्रग्सची जप्ती असून भर समुद्रात करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असून भारतीय नौदलाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. तसेच यापुढे नौदलाच्या सहकार्यने यापुढेही या प्रकारच्या कारवाई सुरूच राहणार असल्याचेही एनसीबीने म्हटले आहे.

    आपल्या शेजारच्या देशाकडून  भारतात आणि इतर देशामध्ये ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर केला गेला असून या ड्रग्स सिंडिकेटचे पाळेमुळे भारतासह इतर देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे एनसीबीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

    Bureau of Narcotics Control operations at sea with the help of the Navy; Drugs worth Rs 2000 crore seized from Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य