• Download App
    बसपाचा पुन्हा नारा, हाथी नहीं गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है, ब्राम्हण समाजाला जोडण्याचा प्रयत्न|BSP's slogan again, Hati nahi Ganesh hai, Brhma Vishnu Mahesh Hai

    बसपाचा पुन्हा नारा, हाथी नहीं गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है, ब्राम्हण समाजाला जोडण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार असे म्हणत एकेकाळी उत्तर प्रदेशात ब्राम्हणविरोधी राजकारणाचा चेहरा बनलेल्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राम्हण समाजाचा पुळका आला आहे. त्यामुळे बसपाकडून २३ जुलैरोजी अयोध्येतून विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे.BSP’s slogan again, Hati nahi Ganesh hai, Brhma Vishnu Mahesh Hai

    मायावती यांनी स्वत: याबाबत माहिती देताना सांगितले की, मला पूर्ण आशा आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज भाजपाला मतदान करणार नाही. बसपा सरचिटणीस एस सी मिश्रा यांच्या नेतृत्वात २३ जुलै रोजी अयोध्येतून ब्राह्मण समाजाला जोडण्यासाठी व त्यांचे हीत बसपा सरकारमध्येच आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार आहे. अयोध्येत ब्राह्मण संमलेन घेतले जाणार आहे.



    बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्यासोबत मायावती यांनी उत्तर प्रदेशात जातीय राजकारणाचे विष पेरले. मागासवर्गीय मतांना आकर्षित करून घेण्यासाठीत त्यांनी ब्राम्हण आणि इतर उच्च जातींविरुध्द राजकारण सुरू केले. त्यामुळेच त्यांनी तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार अशी घोषणा दिली होती.

    यामध्ये तिलक म्हणजे ब्राम्हण, तराजू म्हणजे वैश्य आणि तलवार म्हणजे क्षत्रिय असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मागासवर्गीय समाजाकडून पुरेशी मते मिळत नाहीत असे लक्षात आल्यावर त्यांनी हाथी नहीं गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है अशी घोषणा दिली होती. त्यात ब्राम्हण समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केल होता.

    मात्र, मायावतींचे राजकारण उच्च जातींना पसंत आले नाही. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष तिसºया क्रमाकांवर गेला. त्यामुळे त्यांनी पुन्हा दलित आणि महादलित जातींचे राजकारण सुरू केले. मात्र, गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता पुन्हा मायावती यांनी ब्राम्हण समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

    BSP’s slogan again, Hati nahi Ganesh hai, Brhma Vishnu Mahesh Hai

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य