• Download App
    जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठकीतून पंतप्रधानांचा पुढाकार चांगला, बसपच्या सुप्रिमो मायावती यांनी केले कौतुक|BSP supremo Mayawati lauds PM's initiative in all-party meeting on Jammu and Kashmir

    जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठकीतून पंतप्रधानांचा पुढाकार चांगला, बसपच्या सुप्रिमो मायावती यांनी केले कौतुक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी २४ जूनला जम्मू काश्मीरबाबत होणाऱ्या बैठकीचे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांनी घेतलेला पुढाकार चांगला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे काश्मीरबाबत ठोस निर्णय होण्यास मदत होईल.BSP supremo Mayawati lauds PM’s initiative in all-party meeting on Jammu and Kashmir


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी २४ जूनला जम्मू काश्मीरबाबत होणाऱ्या बैठकीचे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांनी घेतलेला पुढाकार चांगला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे काश्मीरबाबत ठोस निर्णय होण्यास मदत होईल.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले आहे.मायावती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की पंतप्रधानांसोबत जम्मू आणि काश्मीरच्या १४ नेत्यांसोबत होणारी बैठक फलदायी होईल अशी आशा आहे. पंतप्रधानांनी घेतलेला हा पुढाकार चांगला आहे.



    सुमारे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या बैठकीत जम्मू आणि काश्मीरबाबत काही ठोस निर्णय घेतले जातील. जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा कायम ठेवण्याबाबतही या बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुकांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर आणायला हवी.

    काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या राजकीय पक्षांच्या गुपकर संघटनेने निर्णय घेतला आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीपूर्वी मंगळवारी श्रीनगरमध्ये गुपकार संघटनेची बैठक झाली.

    गुपकार संघटनेच्या बैठकीनंतर फारूक अब्दुला म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीनंतर श्रीनगर आणि दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला जाईल. गुपकार संघटनेचा जो अजेंडा आहे तोच यापुढे कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केल

    सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरच्या एकूण १६ नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७०, ३५ ए हटवल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील नेत्यांसोबत संवाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे..

    जम्मू आणि काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देणे हाच बैठकीचा प्रमुख अजेंडा राहणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. जम्मू आणि काश्मिरातील काँग्रेस नेत्यांसोबतही याबाबत चर्चा करणार असून, त्यानंतर पक्षश्रेष्ठींचेही मार्गदर्शन घेणार असल्याचे आझाद यांनी सांगितले.

    BSP supremo Mayawati lauds PM’s initiative in all-party meeting on Jammu and Kashmir

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते