BSP Candidates List : मायावतींनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बसपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुजन समाज पक्षाने विशेषत: पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पश्चिम यूपीमधील 58 विधानसभा जागांपैकी 53 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. BSP Candidates List Mayawati announces first phase list of BSP candidates, read more
वृत्तसंस्था
लखनऊ : मायावतींनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बसपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुजन समाज पक्षाने विशेषत: पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पश्चिम यूपीमधील 58 विधानसभा जागांपैकी 53 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
पहिल्या टप्प्यातील महत्त्वाच्या जागांचे बोलायचे झाले तर, बसपाने कैरानामधून राजेंद्र सिंह उपाध्याय आणि बुढाणामधून मोहम्मद अनिश यांना तिकीट देण्यात आले आहे. कृपाराम शर्मा यांना नोएडामधून तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने रझिया खान यांना अलीगडमधून उमेदवारी दिली आहे.
यूपी निवडणुकीचा निकाल 10 मार्चला
10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.
BSP Candidates List Mayawati announces first phase list of BSP candidates, read more
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित; संपत चालल्याची चंद्रकांत पाटील यांची टीका
- BJP Candidates List : यूपी निवडणुकीसाठी भाजपकडून १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी गोरखपूरमधून लढणार, ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
- अखिलेशकडून बहुजन समाजाचा अपमान, त्यांना दलित नेते नकोत फक्त व्होट बँक हवी; भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आजादांचा हल्लाबोल!!
- वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कठोर निर्बंध होण्याची शक्यता , अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
- हिंदूंनी एका घरात कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच, मिलिंद परांडे यांचे वादग्रस्त विधान