• Download App
    लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप|Brotherhood erupts in Lalu Prasad's house, younger brother Tejpratap accuses Tejaswi of keeping Lalu locked up in Delhi

    लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरात भाऊबंदकी उफाळून आली आहे. तेजस्वी यादव आणि त्यांचे धाकटे भाऊ तेजप्रताप यादव यांच्यातील वादाने गंभीर स्वरुप घेतले आहे. लालूप्रसाद यादव यांना तेजस्वीने दिल्लीमध्ये कोंडून ठेवले असल्याचा आरोप तेजप्रताप यादव यांना केला आहे.Brotherhood erupts in Lalu Prasad’s house, younger brother Tejpratap accuses Tejaswi of keeping Lalu locked up in Delhi

    बिहारमधील विरोधी पक्षनेते असलेल्या तेजस्वी यादव यांच्यावर तेजप्रताप यादव यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, चार-पाच लोक आहेत जे राष्ट्रीय जनता दलाच्या प्रमुख असलेल्या लालूप्रसाद यादव यांना पाटण्याला येऊनच देत नाहीत. त्यांना कारागृहातून बाहेर आल्याला जवळपास एक वर्ष झाले आहे. मात्र, एकदाही त्यांना पाटण्याला येऊ देण्यात आलेले नाही.



    तेजप्रताप यादव गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वी यांच्यावर टीका करत आहेत. नुकतेच लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना दिल्लीत बोलावून समजावून सांगितले होते. त्यानंतर ते काही काळ शांत झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा आरोप सुरू केले आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या विद्यार्थी संघटनेला समांतर संघटना तेजप्रताप यांनी उभी केली आहे.

    छात्र जनशक्ती परिषदेच्या शिबिरात त्यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकाविला आहे. ते म्हणाले मी वडीलांना म्हणालो की पाटण्याला चला. तेथे येऊन सर्व काही पाहा. पूर्वी आपल्या घराचा दरवाजा सर्वांसाठी उघडा असायचा. तुम्ही आऊटहाऊसमध्ये बसायचात. जनतेला भेटायचात. मात्र, आता काय झाले आहे. कुलूपे लावली आहेत. जनता आमच्यापासून दूर गेली आहे.

    राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यावरही हल्लाबोल करताना तेजप्रताप यादव म्हणाले, काही जणांना काही लोक राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष होण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, मी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.

    Brotherhood erupts in Lalu Prasad’s house, younger brother Tejpratap accuses Tejaswi of keeping Lalu locked up in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये