• Download App
    जालियनवाला बाग हत्या हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या शहीद उधम सिंह यांचे पिस्तूल आणि डायरी लंडनमधून परत आणा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र|Bring back from London the pistol and diary of Shaheed Udham Singh who avenged the Jallianwala Bagh massacre; Capt. Amarinder Singh's letter to the Foreign Minister

    जालियनवाला बाग हत्या हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या शहीद उधम सिंह यांचे पिस्तूल आणि डायरी लंडनमधून परत आणा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र

    वृत्तसंस्था

    चंडीगड : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक देदीप्यमान क्रांतिकारी शहीद उधमसिंग यांचे पिस्तूल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणावी, अशी मागणी करणारे पत्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना लिहिले आहे.Bring back from London the pistol and diary of Shaheed Udham Singh who avenged the Jallianwala Bagh massacre; Capt. Amarinder Singh’s letter to the Foreign Minister

    शहीद उधमसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी मायकल ओ डायर याची लंडनमध्ये जाऊन हत्या केली होती. या हत्येनंतर उधमसिंग यांच्यावर लंडनमध्येच खटला चालवून त्यांना फाशी देण्यात आले होती. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात शहीद उधम सिंह यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे.



    13 एप्रिल 1919 या काळ्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. ब्रिटिशांच्या जुलमी ऑफिसरने मायकल ओ डायर याने नि:शस्त्र भारतीय निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. या गोळीबारात शेकडो भारतीय शहीद झाले. उधमसिंग या भयानक हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांनी त्याच वेळी या हत्याकांडाचा सूड घेण्याचे निश्चित केले.

    ही सूड घेण्याची संधी त्यांना 13 मार्च

    1940 रोजी मिळाली. लंडनच्या कॅक्स्टन हॉल इथे एका समारंभ करतात मायकल ओ डायर येणार आहे हे समजताच त्यांनी त्याचा सूड घेण्याकरिता तोच दिवस निवडला. एका जाड ग्रंथात आपले पिस्तुल लपवून उधमसिंग तेथे पोहोचले मायकल ओ डायर भाषणाला उभा राहताच त्यांनी पुढे येऊन आपले पिस्तुल त्याच्यावर रिकामे केले.त्यातल्या दोन गोळ्या मायकल ओ डायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला.

    आपला सूड पूर्ण झाल्यावर उधमसिंग यांनी पळून जाण्यापेक्षा स्वतःला अटक करवून घेणे पसंत केले. उधमसिंग यांच्यावर लंडनमध्येच खटला चालवण्यात आला. मायकल ओ डायरच्या हत्येसाठी दोषी ठरवून उधमसिंग यांना 31 जुलै 1940 रोजी लंडनच्या पॅन्टव्हिल जेलमध्ये फाशी देण्यात आले.

    शहीद उधमसिंग यांच्या वापरातल्या वस्तू, तसेच पिस्तुल आणि डायरी ब्रिटिशांनी जप्त केली. ब्रिटीशांचासाठी जरी त्या एका गुन्हेगाराच्या वस्तू असल्या, तरी भारतवासीयांसाठी त्या शहिदाच्या गौरव पूर्ण वस्तू आहेत. त्यांची जपणूक व्हायला पाहिजे,

    या हेतूने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून ब्रिटिश सरकारकडे शहीद उधमसिंग यांच्या पिस्तूल आणि डायरीची मागणी करावी आणि त्या भारतात घेऊन याव्यात, असे मागणी करणारे पत्र लिहिले आहे.

    Bring back from London the pistol and diary of Shaheed Udham Singh who avenged the Jallianwala Bagh massacre; Capt. Amarinder Singh’s letter to the Foreign Minister

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!