• Download App
    ब्रिगेडियर लिड्डर अंतिम निरोप; वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात...!! । Brigadier lidder final salute by his wife and daughter

    ब्रिगेडियर लिड्डर अंतिम निरोप; वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात…!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एक वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात… आज हा प्रत्यय आला…!! तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या ब्रिगेडियर बी एस. लिड्डर यांच्या पत्नी गीतिका आणि कन्या अहेसान यांनी धीरोदात्तपणे लिड्डर यांना अंतिम निरोप दिला. Brigadier lidder final salute by his wife and daughter

    मी एका शूर वीर सैनिकाची पत्नी आहे. त्यांना आम्ही हसत मुखानेच निरोप दिला पाहिजे. त्यांनी देशसेवा केली. देशसेवेत रत असतानाच त्यांना मृत्यू आला. एक वीर पत्नी म्हणून त्यांना निरोप देताना मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत गीतिका यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

    तर त्यापुढे जाऊन ब्रिगेडियर लिड्डर यांची कन्या अहसान हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक पिता म्हणून त्यांनी मला प्रेम दिले. शिस्त लावली. मी आता सतरा वर्षांची होणार आहे. सतरा वर्षांच्या जीवनात त्यांनी मला भरपूर काही दिले. मला त्यांचा अभिमान वाटतो.कदाचित नियतीच्या मनात असावे की त्यांचा आणि माझा सहवास फक्त 17 वर्षांपुरताच असावा. परंतु त्यांची प्रेरणा माझ्या बरोबर आयुष्यभर राहील. ही प्रेरणा मला कायम जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करीत राहील. देशसेवेसाठी मी त्यांच्यासारखा त्याग करेन, असा मला आशीर्वाद हवा आहे, अशा भावना अहेसान लिड्डर हिने व्यक्त केल्या आहेत. एक वीर पत्नी आणि वीर कन्याच आपल्या शूर वीर पती आणि पित्याल असा स्फूर्तीदायक निरोप देऊ शकतात याचा प्रत्यय यातून येतो.

    Brigadier lidder final salute by his wife and daughter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली