वृत्तसंस्था
चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्याच्या वेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाब सरकारची गंभीर चूक झाली आहे. आवश्यक तेवढा सिक्यूरिटी फोर्स पंजाब सरकारने हुसैनीवाला परिसरात ठेवला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या ताफ्याने ऐनवेळेला माघारी फिरून त्याला येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिरोजपुरचा दौरा आयत्या वेळेला रद्द करण्यात आला आहे. Breaking News: Punjab govt makes serious mistake in PM’s security arrangements; Tour of Ferozepur canceled on time !! Prime Minister returns to Bhatinda !!
पंजाबमध्ये गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच गेलेल्या पंतप्रधानांना केवळ सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर चुकीमुळे माघारी फिरावे लागले. याचे तीव्र पडसाद देशाच्या राजकीय वर्तुळात उमटायला लागले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात केलेल्या खुलासा मध्ये पंजाबच्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पंतप्रधानांचा नियोजित दौरा खूप आधी कळवण्यात आला होता. परंतु पंजाब सरकारने प्रोटोकॉल नुसार आवश्यक तेवढा सिक्युरिटी फोर्स उपलब्ध करून दिला नाही. पंजाबमध्ये हवामान खराब असल्यामुळे हुसैनीवालाच्या शहीद स्मारकात पंतप्रधान रस्ते मार्गाने पोहोचत होते. शहीद स्मारकापासून अर्धा तासाच्या अंतरावर उड्डाणपुलावर काही निदर्शक उभे असल्याचे पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकार्यांच्या लक्षात आले. संबंधित निदर्शने नियोजित नव्हती. पंतप्रधानांचा गाड्यांचा ताफा सुमारे पंधरा मिनिटे या निदर्शकांमुळे जिथल्या तिथे थांबून राहावा लागला. पंजाब सरकारची ही सुरक्षा व्यवस्थेतील अत्यंत गंभीर चूक आहे.
या संदर्भात पंजाब सरकारला तातडीने खुलासा मागण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या सगळ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिरोजपुरचा दौरा त्यावेळेला रद्द करावा लागला असून पंतप्रधानांचा ताफा भटिंडाकडे परत वळवण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मंसुख मंडविया यांनी फिरोजपूरमध्ये व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आयत्या वेळेला रद्द करावा लागण्याची घोषणा केली आहे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे देखील मंडविया यांनी स्पष्ट केले आहे.