• Download App
    ३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका... हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार Both factions of Hurriyat Conference likely to be banned under UAPA

    ३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका… हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार

    हुर्ऱियतचे अनेक नेते हे टेरर फंडिंगमध्ये सापडले आहेत. काश्मिरींना पाकिस्तानमध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या निमित्ताने हुर्ऱियतच्या मंडळींनी हिज्बुल मुजाहिदीन, लष्करे तोयबाचा मदतीने देश-परदेशांमध्ये करोडो रूपये हवालामार्गे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हाच पैसा वापरून ते सुरक्षा दलांवर हल्ले, भाजपच्या नेत्यांच्या हत्या, शाळांना-रूग्णालयांना आगी, सरकारी इमारतींचे नुकसान यासारख्या कारवाया करत आहेत. Both factions of Hurriyat Conference likely to be banned under UAPA


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : दहशतवाद्यांना आणि दहशतवादी कारवायांना वित्त पुरवठा करण्याप्रकरणी (टेरर फंडिंग) हुर्ऱियत काॅन्फरन्स या फुटीरतावादी गटांच्या फेडरेशनवर बंदी घालण्याचा केंद्र सरकार गंभीर विचार करत आहे. विशेष म्हणजे, ही बंदी हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर (जहाल व कथित मवाळ) घातली जाण्याची शक्यता आहे. कलम ३७० रद्द करण्यापाठोपाठ या दुसरा दणका दहशतवादी मंडळींना मिळणार आहे.

    हुर्ऱियतची स्थापना दहशतवादी कारवाया टोकावर असताना म्हणजे १९९३ मध्ये झाली होती. यामध्ये एकूण २६ प्रकारच्या फुटीरतावदी संघटनांचा समावेश होता. त्यामध्ये जमाते इस्लामी, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, पीपल्स कॉन्फरन्स, अवामी अॅक्शन कमिटी, दुखतरन-ए- मिल्लत यासारख्या गटांचा समावेश होता. पण पुढे त्यांच्यामध्ये मतभेद झाल्याने २००५ मध्ये हुर्ऱियत दोन गटांमध्ये विभागली गेली. कथित मवाळवादी गटांचे नेतृत्व मीरवाईज उमर फारूककडे गेले, तर जहाल-हिंसावादी गटांचे नेतृतव सय्यद अली शाह गिलानीकडे गेले होते.



    ३७०वे कलम रद्द केल्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये कमालीची घट झाली असताना बंदीचे हत्यार उचलण्याचे केंद्राने ठरविले आहे. ही बंदी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) घातली जाणार आहे. हे पाऊल उचलण्याचे कारण म्हणजे हुर्ऱियतचे अनेक नेते हे टेरर फंडिंगमध्ये सापडले आहेत. काश्मिरींना पाकिस्तानमध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या निमित्ताने हुर्ऱियतच्या मंडळींनी हिज्बुल मुजाहिदीन, लष्करे तोयबाच्या मदतीने देश-परदेशांमधून करोडो रूपये हवालामार्गे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हाच पैसा वापरून ते काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना जिवंत ठेवत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पैशांमधून सुरक्षा दलांवर हल्ले, भाजपच्या नेत्यांच्या हत्या, शाळांना-रूग्णालयांना आगी, सरकारी इमारतींचे नुकसान यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. एकूणच भारताविरुद्ध अघोषित युद्धच पुकारले आहे.

    Both factions of Hurriyat Conference likely to be banned under UAPA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी