वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : “सॅटॅनिक व्हर्सेस” या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आणि बुकर पारितोषिक विजेते कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चौटाका येथे भर कार्यक्रमात चाकू हल्ला करण्यात आला आहे. चौटाका इन्स्टिट्यूटच्या स्टेजवर एका व्यक्तीने रश्दी यांच्यावर अचानक हल्ला केला. Booker Prize-winning author Salman Rushdie stabbed at New York event
रश्दींची ओळख करून देत असताना त्यांना भोकसले आहे. या हल्ल्यानंतर रश्दी हे जमीनीवर कोसळले. सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते लखक आहेत. सलमान रश्दींच्या “द सॅटॅनिक व्हर्सेस” या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिमांनी ते निंदनीय मानले आहे. एका वर्षानंतर इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दींच्या मारण्याचा फतवा जारी केला. इराणने रश्दींना मारणाऱ्यास $3 दशलक्षपेक्षा जास्त बक्षीस देणार असे जाहीर केले आहे.
कोण आहेत सलमान रश्दी?
सलमान रश्दी हे जागतिक किर्तीचे वादग्रस्त लेखक आहेत. त्यांच्या “सॅटॅनिक व्हर्सेस” या पुस्तकात महंमद पैगंबराची निंदा आहे, असा आरोप करत भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी रश्दी यांच्या “सॅटानिक व्हर्सेस” या पुस्तकावर बंद घातली होती. या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातच मोठे मतभेद उत्पन्न झाले होते. पुस्तकावर बंदी घालणे ही राजीव गांधी यांची चूक होती असे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 2015 मध्ये म्हटले होते.
सर अहमद सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 मध्ये झाला. ते ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि लेखक आहेत. त्यांच्या मिडनाईट्स चिल्ड्रेन या दुसऱ्या कादंबरीला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांची चौथी कादंबरी “सॅटानिक व्हर्सेस” ही वादाचे केंद्रबिंदू ठरली होती. या कादंबरीला अनेक मुस्लिम देशांनी जोरदार विरोध केला. काही भागात तर हिंसक आंदोलनं झाली होती. या पार्श्वभूमीवर रश्दी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Booker Prize-winning author Salman Rushdie stabbed at New York event
महत्वाच्या बातम्या
- तालिबानी नेता शेख रहीमुल्लाह हक्कानी आत्मघातकी हल्ल्यात ठार, पाक आणि अफगाणिस्तानात अनेक अनुयायी
- मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागो, खाते वाटपाला उशीर होवो; पण पक्षांचे संघटनात्मक काम जोरावरच!!
- महाराष्ट्र – मुंबईत भाजपचे नवे कॅप्टन्स; प्रदेशाध्यक्ष पदी बावनकुळे, तर आशिष शेलार भाजपा मुंबई अध्यक्ष!!
- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूमध्ये उपचार; पीएम मोदींनीही केली विचारपूस