वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विमान अपघाताचे कारण शोधून काढण्यासाठी विमानात असलेला ब्लॅकबॉक्स मोलाची मदत करत होता. आता तो कारमध्येही बसविला जावा, असा आदेश युरोपात काढला आहे. Blackbox in Cars mandatory, Implementation in European Countries to Reduce Accidents
युरोपातील अनेक देशांनी कारमध्ये ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं आहे. ज्यामुळे अपघात झाल्यास, अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी डेटा रेकॉर्ड करुन, त्याचं विश्लेषण केलं जाईल. युरोपीय संघाने 6 जुलैपासून कारमध्ये ब्लॅक बॉक्सच्या अनिवार्य केला आहे. सर्व कार कंपन्यांना ब्लॅक बॉक्स ठेवणं बंधनकारक केले आहे.
ब्लॅक बॉक्स कसे काम करेल ?
ब्लॅक बॉक्स कारचा स्पीड, ब्रेकची स्थिती, स्टेअरिंग व्हिल, रस्त्याचं वळण, सीटबेल्टचा वापर हा सर्व डेटा जमा करेल. अपघात झाल्यास, यातून सर्व माहिती समोर येईल, तसंच अपघाताचं कारण समजणार आहे.
ब्लॅक बॉक्स बंद होणार नाही
कारमधील ब्लॅक बॉक्स ड्रायव्हर बंद करू शकत नाही. कार सुरू होटाच ब्लॅक बॉक्स डेटाचं रेकॉर्डिंग सुरू करेल. त्याशिवाय एक मर्यादित वेळेचं रेकॉर्डिंग नेहमी उपलब्ध असेल.
Blackbox in Cars mandatory, Implementation in European Countries to Reduce Accidents
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण जाण्यास ठाकरे-पवार सरकारच जबाबदार ; आता ओबीसींचे राजकीय आरक्षणही रद्द ; माविआ सरकारने संभाजीराजे यांचा अवमान करू नये : पंकजा मुंडे
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
- कोरोनाविरोधी लशींची किंमत एकच ठेवा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला
- कोरोनाने सरलेल्या वर्षात लावली अर्थव्यवस्थेची पुरती वाट; पण चौथ्या तिमाहीत जीडीपीचा चांगलाच दिलासा!