• Download App
    श्री राम मंदिराचा चौथरा काळ्या ग्रेनाइटमध्ये; कर्नाटकातून अयोध्येमध्ये आणला; भारतातून गोळा केलेल्या लाखो विटांचा वापर बांधकामात होणार। Black granite from Karnataka to raise Ram temple plinth; All the bricks collected from across the country will be used in the construction of the temple.

    श्री राम मंदिराचा चौथरा काळ्या ग्रेनाइटमध्ये; कर्नाटकातून अयोध्येमध्ये आणला; भारतातून गोळा केलेल्या लाखो विटांचा वापर बांधकामात होणार

    वृत्तसंस्था

    अयोध्या : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. मंदिराचा पाया पूर्ण झाल्यानंतर, त्याची उंची समुद्र सपाटीपासून १०७ मीटर पर्यंत वाढवल्यानंतर, प्रस्तावित गर्भगृहात विशेष ‘मुहूर्त’ प्रार्थना केल्यानंतर मंगळवारी रामजन्मभूमी येथे बांधकामाचा दुसरा टप्पा सुरू झाला. चौथरा हा काळ्या ग्रेनाईटमध्ये साकारला जाणार असून देशभरातून गोळा केलेल्या सर्व विटांचा वापर मंदिराच्या बांधकामात होणार आहे. Black granite from Karnataka to raise Ram temple plinth; All the bricks collected from across the country will be used in the construction of the temple.

    कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील जंगलातील कोल्लेगल भागातील खाणीतून पहिल्यांदा काळे ग्रेनाइट दगड पाठवले जात आहेत, त्याशिवाय मिर्झापूर येथून शिल्पकृतीसाठी उपयुक्त दगड आणि राजस्थानातील बन्सी पहारपूर येथून गुलाबी संगमरवर रवाना केले जात आहेत. समारंभाला उपस्थित असलेले मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले, “गर्भगृह उभारण्यासाठी पहिला दगड बसवण्यापूर्वी वैदिक मंत्रांच्या दरम्यान भगवान विश्वकर्माची पूजा करण्यात आली. कोलेगल आणि मिर्झापूर येथून काळ्या ग्रॅनाईटचा पुरवठा सुरू झाला आहे.



    तीन दशकांपासून विहिंपने भारतभरातून दोन लाखांहून अधिक विटा गोळा केल्या होत्या. त्या आता मंदिराच्या बांधकामासाठी वापरल्या जातील, असे ट्रस्टच्या उच्च सुत्रांनी सांगितले. १९८९ पासून, रामच्या नावाच्या ३ लाखांहून अधिक विटा मंदिरासाठी वापरण्याची प्रतिज्ञा घेऊन जमवल्या होत्या. परंतु नंतर त्या रामजन्मभूमी निर्माण कार्यशाळेत ठेवण्यात आल्या आहेत. त्या आता मंदिर बांधकाम कार्यशाळेत स्थलांतरित केल्या जातील. मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले, “रामजन्मभूमीवर कार सेवकांनी १९८९ च्या ‘शिलान्यासा’ दरम्यान एक लाख दगड घातले होते.” मिश्रा म्हणाले, “कमीतकमी २ लाख विटा जुन्या कार्यशाळेत शिल्लक आहेत. त्या बांधकाम साइटवर हलवल्या जातील. विटा कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाची साक्ष देतात.

    Black granite from Karnataka to raise Ram temple plinth; All the bricks collected from across the country will be used in the construction of the temple.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!