वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात ब्लॅक फंगसचे संकट वाढत चालले आहे. आता तर हा आजार आता महामारीच्या यादीत जाऊन बसला आहे. त्या अंतर्गत तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांनी हा निर्णय आधीच घेतला आहे. Black fungus epidemic declared by five states including Gujarat; Responding to the call of the Central Government
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ब्लॅक फंगसला एपिडेमिक डिसिजेस अॅक्ट, 1897 अन्वये महामारी जाहीर करावे, असं आवाहन सर्व राज्यांना केलं होतं. केंद्रीय मंत्रालयाने या संबंधी सर्व राज्यांना एक पत्र लिहिले होतं.
त्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये, खासकरुन ज्यांना मधुमेहाचा त्रास असणाऱ्यामध्ये आजाराचा धोका वाढत असल्याचं सांगितलं होते. ब्लॅक फंगसच्या रुग्णांसंबंधी सर्व माहिती रुग्णालयांनी आणि त्या-त्या राज्यांनी देणं बंधणकारक असल्याचं या पत्रात नमूद केले आहे.
केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन राज्यांनीआणि एका केद्रशासित प्रदेशाने गुरुवारी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यात तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडचा समावेश आहे. तेलंगणा आणि राजस्थान यांनी पूर्वीच तसा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकार गाढ निद्रेत
गुजरातमध्ये ब्लॅक फंगसचे 2281 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या 2000 आहे. पण, अन्य राज्याप्रमाणे या आजाराला राज्याने महामारी घोषित केलेले नाही.
2000 रुग्णसंख्या गाठूनही राज्य सरकार गाढ निद्रेत असल्याचे दिसते. या उलट अन्य गुजराथ सह अन्य राज्यांनी केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तशी घोषणा केली आहे.
Black fungus epidemic declared by five states including Gujarat; Responding to the call of the Central Government
महत्त्वाच्या बातम्या
- शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल करणाऱ्या प्रदीप गावडे यांना अटक, नोटीस न पाठवताच कारवाईचा भाजपाचा आरोप
- पवारांवर टीका केल्याने अॅड. प्रदीप गावडेंना तत्परतेने अटक, पीएम मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे अद्याप मोकाट!
- ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनच्या उत्पादन, आयतीसाठी सहा कंपन्यांना परवानगी
- गुजरातमध्ये आढळले ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण ; महाराष्ट्र, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर
- प्रकाश जावडेकरांचा आरोप- काँग्रेसकडून जाणूनबुजून नकारात्मक राजकारण, सोनिया गांधींनी उत्तर द्यावे