• Download App
    Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना । Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission

    Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना

    केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन दिवसांत या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच औषध कंपन्यांना परवाना देण्यात आलेला आहे. Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन दिवसांत या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच औषध कंपन्यांना परवाना देण्यात आलेला आहे.

    केंद्रीय मंत्री म्हणाले की, सध्या सहा कंपन्या या औषधाची निर्मिती करत आहेत. याव्यतिरिक्त आणखी पाच कंपन्यांना हे औषध तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यमान कंपन्यांनीही उत्पादन वाढविणे सुरू केले आहे. सोबतच भारतीय कंपन्यांनीही या औषधाच्या सहा लाख व्हॉयल्सची ऑर्डर दिलेली आहे.

    IMAचे पंतप्रधान मोदींना पत्र

    तत्पूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील औषध कंपन्यांना काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिसचे औषधे तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. संघटनेने पंतप्रधानांना आग्रह केला की, पंतप्रधानांनी डीसीआरजीला यासंबंधी देशातील पात्र औषध कंपन्यांना आपत्कालीन किंवा अल्प-मुदतीची परवाना देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही केली होती.

    Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती