• Download App
    भाजपाच्या तामीळनाडू प्रदेशाध्यक्षपदी के. अन्नामलाई, एल. मुरुगन यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने दिला राजीनामा|BJP's Tamil Nadu state president K. Annamalai, L. Murugan resigns after made minister

    डॅशिंग (माजी) आयपीएस ऑफिसर के. अन्नामलाई भाजपाच्या तमिळनाडू अध्यक्षपदी…

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अन्नामलाई यांची नियुक्ती झाली आहे.BJP’s Tamil Nadu state president K. Annamalai, L. Murugan resigns after made minister

    मुरुगन यांना माहिती आणि प्रसारण विभागाच्या राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले अन्नामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत.



    ते भाजपाचे तामीळनाडू उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अन्नामलाई यांनी तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट २०२० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अर्वाकुरिची विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढली होती.

    मात्र, त्यांचा पराभव झाला. मात्र, आपल्या विविध वक्तव्यांनी ते चांगलेच प्रसिध्दीस आले होते. त्यामुळेच पक्षात येऊन वर्षही झालेले नसताना केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

    BJP’s Tamil Nadu state president K. Annamalai, L. Murugan resigns after made minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये