वृत्तसंस्था
आगरतळा : गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा हे छोटे राज्य देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तिथल्या कथित हिंसाचारा वरून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने मोर्चे काढले. त्यात दगडफेक होऊन दंगली झाल्या. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. परंतु प्रत्यक्षात त्यावेळी त्रिपुरात काही घडलेच नव्हते. तरीदेखील त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचे प्रयत्न झाले.BJP’s huge success in Tripura
त्यानंतर त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय तृणमूल काँग्रेसने तापविला. ज्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला रस होता त्याच निवडणुकीत भाजपने अतिशय अभूतपूर्व यश संपादन केले असून 14 पैकी 11 नगरपंचायत वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे किंबहुना तिथे 100% जागा भाजपने जिंकल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने त्रिपुरामध्ये येऊन भाजपला उखडण्याची भाषा केली होती. ती तृणमूल काँग्रेस तिथे येऊन रुजण्यापूर्वीच उखडली गेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या अभूतपूर्व विजयाची दखल घेतली असून जाहीर झालेल्या 334 जागांपैकी 329 जागा भाजपने जिंकल्याबद्दल पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. साडे चार लाखहून अधिक मतदान झालेल्या या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठी हवा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्यक्षात मतदारांनी अक्षरश: त्या पक्षाचा सुपडा साफ केला आहे. आगरतळा महापालिकेत 51 वॉर्डांपैकी 29 वॉर्डांमध्ये विजय नोंदवून भाजपने बहुमत मिळवले आहे.
मतदान झाले, त्याच दिवशी तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर या निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप करत मतमोजणी रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने परिस्थितीची छाननी केल्यानंतर तृणमूल काँग्रेसची मागणी फेटाळली. आज प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. महत्त्वाच्या आगरतळा महापालिकेमध्ये भाजपने ५१ जागांपैकी पैकी पैकी ५१ वॉर्ड जिंकत संपूर्ण बहुमत मिळवले आहे.
त्यामुळे इथून पुढच्या काळात त्रिपुरामध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांची राजकीय लढाई कशी चालेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. या राजकीय लढाईत त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आमने सामने असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा
- युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल
- अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका