• Download App
    ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकांतही भाजपचाच झेंडा, योगी सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केले कौतुक|BJP's flag in the election of block heads, PM praises BJP's victory in block chief elections, says Yogi government's policies

    ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकांतही भाजपचाच झेंडा, योगी सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात जिल्हा पंचायत निवडणुकांपाठोपाठ ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. राज्यातील ८२५ ब्लॉकपैकी ६३६ ब्लॉकमध्ये भाजपाने विजय मिळविला आहे. समाजवादी पक्षाला मेटाकुटीने १०० जागाही मिळाल्या नाहीत. योगी सरकारने राबविलेल्या धोरणांचा हा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.BJP’s flag in the election of block heads, PM praises BJP’s victory in block chief elections, says Yogi government’s policies

    गेल्या काही दिवसांत योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याच प्रयत्न होत आहे. सुरूवातीला जिल्हा पंचायत निवडणुकांत भाजपाचा पराभव झाला असे पसरविण्यात आले. मात्र, त्यानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांत ७५ पैकी ६७ जागा जिंकून योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.



    त्यानंतर गंगा नदीतील मृतदेहावरूनही योगी आदित्यनाथ यांच्या बदनामीची मोहीम उघडण्यात आली. मात्र, गंगा नदीत मृतदेह सोडून देण्याची परंपराच असल्याचे उघड झाले. योगी आदित्यनाथांच्या कोरोना काळातील कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येनेच विरोधकांना उत्तर देण्यात आले.

    आता ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशावरील आपली पकड आणखी घट्ट केली आहे. ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३४९ जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. याबाबत आनंद व्यक्त करताना योगी आदित्यनाथ म्हणाले आम्ही ६३५ पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.

    उत्तर प्रदेशातील पुढील निवडणुकीतील दावेदार समजल्या जाणाºया समाजवादी पार्टीला १०० जागाही मिळाल्या नाहीत. समाजवादी पक्षाला केवळ ५५ जागा मिळू शकल्या आहेत. राजधानी लखनऊमधील आठपैकी सात जागा भाजपाने तर एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. याठिकाणी समाजयवादी पक्षाला एकही जागा मिळाली नाही.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील आठपैकी पाच जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यात भाजपाने २० पैकी १८ जागा मिळविल्या आहेत.
    ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. काही ठिकाणी पोलीसांवर हल्लेही करण्यात आले आहे.

    BJP’s flag in the election of block heads, PM praises BJP’s victory in block chief elections, says Yogi government’s policies

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के