प्रतिनिधी
भाजप 2024 लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. हैदराबादेत 2 आणि 3 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ही दक्षिण फतेहची तयारी असल्याचे मानले जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) आणि मुस्लिम नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वास्तविक, दक्षिणेतील 5 राज्यांमध्ये लोकसभेच्या 100 हून अधिक जागा आहेत. भाजपची नजर त्यांच्यावरच आहे.BJP’s campaign in KCR-Owaisi’s state National Executive meeting in Hyderabad on 2-3 July, will be the strategy for 2024
भाजपचे लक्ष दक्षिण भारतात विस्तारावर
हैदराबादमध्ये होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व दिग्गज उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शेवटची बैठक नोव्हेंबर 2021 मध्ये नवी दिल्ली येथे झाली, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या अगदी आधी, जिथे भाजपने 2022ची सुरुवात मोठ्या विजयाने केली.
टीआरएसला घेराव घालण्याची तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील एका जाहीर सभेत तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली होती. पंतप्रधानांपूर्वी जेपी नड्डा आणि अमित शहा हेही दौऱ्यावर आले होते. तेलंगण बदल पाहत असून भाजपला संधी देऊ शकते, असे म्हणत त्यांनी केसीआर कुटुंबाच्या राजवटीवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी रणनीती
2023-24 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून भाजप एका बाणाने दोन लक्ष्य भेदण्याची रणनीती आखताना दिसत आहे. एवढेच नाही तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांबाबतही चर्चा होणार आहे.
दक्षिणेतील राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित
हैदराबाद हा ओवेसींचा बालेकिल्ला असल्याने भाजपने आधीच राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले आहेत. 24 मे रोजी तेलंगणाच्या त्यांच्या शेवटच्या दौऱ्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. तेलंगणाचे बंगाल होऊ देणार नाही, असे शाह म्हणाले होते. राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करून ओवेसींच्या पलटवाराचा फायदा भाजपला मिळू शकतो.
टॉप नेत्यांकडे दक्षिणेची जबाबदारी
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय मंत्री सुनील देवधर यांना आंध्र प्रदेशचे सहप्रभारी बनवले आहे. त्रिपुराच्या विजयात सुनील देवधर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनाही सामील करण्यात आले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांच्याकडेही तेलंगणा प्रभारी म्हणून सूत्रे आहे. जेपी नड्डा हेदेखील आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. भाजप संघटन सरचिटणीस बीएल संतोष कर्नाटकातून आहेत. तेही दक्षिणेच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
BJP’s campaign in KCR-Owaisi’s state National Executive meeting in Hyderabad on 2-3 July, will be the strategy for 2024
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद : भाजप उमेदवारांपेक्षा पंकजा मुंडेंचे तिकीट कापल्याच्या मराठी माध्यमांच्या मोठ्या बातम्या!!
- मुंबईत कोरोनाचा स्फोट : 24 तासांत 1242 नवीन रुग्णांची नोंद, 10 रुग्णांना भासली ऑक्सिजनची गरज
- बारावीचा निकाल लागला चांगला, पण नागराज मंजुळे, छाया कदम यांच्या फेसबुक पोस्ट चर्चेत!!
- India Economic Growth : या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.5% राहण्याचा अंदाज, वाढती महागाई आणि जागतिक तणावामुळे वर्ल्ड बँकेने अंदाज कमी केला