विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी: आसामधील ८० पैकी ७३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला एकाही ठिकाणी बहुमत मिळालेले नाही. पाच पालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.BJP wins corporation elections in Assam
भाजपने ६७२ प्रभागांमध्ये तर काँग्रेसला ७१ ठिकाणी विजय मिळवता आला. इतरांना १४९ प्रभाग जिंकता आले. यापूर्वीच ५७ प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. विकासाच्या बाजूने जनतेने प्रचंड कौल दिला आहे अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बाऊआ म्हणाले की, तर राज्याला पक्षाला अधिक मेहनत घ्यावी लागेल.