• Download App
    ‘’२०२४च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपा ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, आणि …’’ अमित शाह यांचे विधान!BJP will win more than 35 seats in West Bengal in 2024 Lok Sabha elections Union Home Minister  Amit Shah

    ‘’२०२४च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपा ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, आणि …’’ अमित शाह यांचे विधान!

    धार्मिक उत्सव लोकांना शांततेत साजरा करता यावेत, कुणालाही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये, असंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पश्चिम बंगाल दौऱ्यात बीरभूममधील सिउरी येथे सभा घेतली. यानंतर ते कोलकाता येथे दक्षिणेश्वर आणि कालीमाता मंदिरात पूजा केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा बंगलामध्ये ३५ पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. BJP will win more than 35 seats in West Bengal in 2024 Lok Sabha elections Union Home Minister  Amit Shah

    अमित शाह म्हणाले, “आज मी बीरभूमला भेट दिली. २०२४ च्या लोकसभेसाठी जो भाजपाचा प्रवास सुरू आहे, त्या  अंतर्गत मी बीरभूमला आलो होतो. ज्याप्रकारचा जोश आणि उत्साह बीरभूममध्ये मी बंगालच्या जनतेचा पाहिला आहे. माझ्या मनात काहीच शंका नाही, की  २०२४च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपा ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि पुन्हा एकदा मोदी ३००हून अधिक जागांसह देशाचे पंतप्रधान होतील.’’

    याशिवाय, ‘’मी आज देवीच्या चरणी हीच प्रार्थना करून आलो आहे, बंगालच्या समस्त जनतेला सुख, शांती लाभो. येथील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ठीक होवो. धार्मिक उत्सव लोकांना शांततेत साजरा करता यावेत, कुणालाही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये. मली निश्चित विश्वास आहे की, येणाऱ्या निवडणुकीत बंगालची जनता, २०१९ प्रमाणे त्याहीपेक्षा अधिक ताकदीने मोदींसोबत आणि भाजपासोबत राहील. मोदी पुन्हा बंगालच्या जनतेच्या आशीर्वादानेच देशाचे पंतप्रधान बनतील.’’ असंही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

    BJP will win more than 35 seats in West Bengal in 2024 Lok Sabha elections Union Home Minister  Amit Shah

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले