• Download App
    अभिषेक बॅनर्जींची ईडीकडून आठ तास चौकशी; बाहेर आल्यावर भाजपला ठोकले; काँग्रेसलाही डिवचले BJP thinks it can frighten TMC by doing all this, if they think TMC will accept defeat like Congress & other parties

    अभिषेक बॅनर्जींची ईडीकडून आठ तास चौकशी; बाहेर आल्यावर भाजपला ठोकले; काँग्रेसलाही डिवचले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली कार्यालयात आज तब्बल आठ तास चौकशी केली. BJP thinks it can frighten TMC by doing all this, if they think TMC will accept defeat like Congress & other parties

    पश्चिम बंगाल मधील कोळसा घोटाळ्यासंदर्भात तसेच मनी लॉन्ड्रिंग संदर्भात त्यांच्यावर आरोप आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ईडीच्या दिल्ली कार्यालयातून बाहेर आल्यावर अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रातल्या भाजप सरकारला ठोकून काढले. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसलाही डिवचले.

    अभिषेक बॅनर्जी म्हणाले, की जो कोणी भाजपच्या विरोधात लढतो त्याला अशाप्रकारे केंद्रीय तपास संस्थांकडून त्रास दिला जातो. माझ्याविरुद्ध ची केस कोलकत्यात दाखल झाली पण मला मुद्दामून दिल्लीत समन्स पाठवून बोलवून घेतले.

    परंतु, भाजपला जर असे वाटत असेल की तृणमूल काँग्रेस अशा प्रकारच्या दबावातून काँग्रेस पक्षासारखा आपला स्वतःचा पराभव मान्य करेल तर भाजप नेते भ्रमात आहेत. तृणमूल काँग्रेस कोणत्याही पद्धतीने दबावाखाली येणार नाही. आम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊ आणि भाजप विरुद्ध आघाडी उघडून जोरदार प्रचार करू. काँग्रेस सारखा पराभव आम्ही स्वीकारणार नाही, याची त्यांनी पुन्हा आठवण करून दिली.

    कोळसा गैरव्यवहार असो किंवा मनी लॉन्ड्रिंग असो माझ्या विरोधात कोणतेही पुरावे असतील तर ते ईडीने ते बाहेर आणावेत, असे आव्हान मी दिले आहे. ते कायम आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध पुरावे द्यावेत मी जाहीरपणे फाशी घ्यायला तयार आहे, असे कोलकत्यात बोललो होतो त्यावर देखील मी ठाम आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.

    आठ तासांच्या चौकशीनंतर अभिषेक बॅनर्जी हे भाजप विरोधात अधिक आक्रमक दिसले. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसने पराभव स्वीकारला तसा आम्ही स्वीकारणार नाही असे सांगून काँग्रेस पक्षालाही डिवचून घेतले.

    BJP thinks it can frighten TMC by doing all this, if they think TMC will accept defeat like Congress & other parties

    Related posts

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?